20 November 2019

News Flash

किडनी डोनेट करुन परागने दिलं भाच्याला नवीन आयुष्य!

पराग घरातील स्ट्राँग स्पर्धकमधून ओळखला जातो

पराग कान्हेरे

लोकप्रिय आणि तितकाच चर्चेत राहणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी. बिग बॉस मराठीचं २ पर्व सुरु होऊन आता बरेच आठवडे उलटले आहेत. या कालावधीमध्ये घरातील प्रत्येक सदस्यांना एकमेकांचे स्वभाव चांगले समजू लागले आहेत. त्यामुळे आता घरातील सदस्य आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याचशा घटना एकमेकांसोबत शेअर करताना दिसत आहेत. त्यातच घरामध्ये सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत राहणारा स्पर्धक पराग कान्हेरेनेदेखील त्याच्या आयुष्यातील महत्वाची आणि अत्यंत संवेदनशील गोष्ट किशोरी शहाणे यांच्याजवळ शेअर केली.

बिग बॉसच्या २ पर्वाच्या सुरुवातीपासूनच पराग घरामध्ये सतत चर्चेत राहिला आहे. उत्तमरित्या टास्क खेळण्याची पद्धत, त्या सोबतच माईंडने गेम खेळण्यामुळे तो घरातील स्ट्राँग स्पर्धकमधून ओळखला जातो. स्टाँग वाटणारा हा स्पर्धक मात्र मनाने तितकाच हळवा आणि संवेदनशील असल्याचं पाहायला मिळालं. परागने त्याच्या भाच्याला किडनी दान केली असून त्याने ही घटना किशोरी शहाणे यांना सांगितली आहे. वूटच्या अनसीन अनदेखाच्या नव्या क्लिपमध्ये पराग किशोरींना हे सांगताना दिसून येत आहे.

माझा भाचा लहान असल्यापासून त्याला किडनी डिसऑर्डरची समस्या आहे. खरं तर या आजाराला नक्की काय म्हणतात हे मला माहित नाही. परंतु लहान असताना त्याची एक किडनी फेल झाली होती. तर दुसरी किडनी थोडीच फंक्शन करत होती. आता तो १२ वर्षांचा असून लहानपणापासूनच त्याची ट्रीटमेंट चालू होती. लहान असताना तो प्रचंड स्मार्ट दिसायचा. तेव्हा त्याने आमच्या एका प्रोडक्शनसाठी मॉडलिंगही केलं होतं. मात्र नंतर आजारपणामुळे त्याची प्रकृती खालावत गेली, असं पराग म्हणाला.

पुढे तो म्हणाला,एकदा अचानक तो आजारी पडला आणि त्याला आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं. तेव्हा त्याची ती परिस्थिती मी पाहू शकलो नाही. त्यानंतर मी लगेच माझ्या मावस भावाला सांगितलं की,माझं नाव डोनर्समध्ये पहिलं लिही. त्यानंतर योगायोगाने माझी किडनी मॅच झाली आणि मी माझी एक किडनी भाच्याला डोनेट केली.

First Published on June 25, 2019 1:26 pm

Web Title: bigg boss marathi 2 parag kanhere reveals he donated his kidney his nephew ssj 93
Just Now!
X