20 November 2019

News Flash

Bigg Boss Marathi 2 : …म्हणून परागला घरात नको वैशाली आणि अभिजीत केळकर

घरातील सदस्यांमध्ये दोन गृप तयार झाले आहेत

बिग बॉस मराठी म्हटलं की घरात वादविवाद आणि परस्परांमध्ये हेवेदावे हे ओघाओघाने आलेच. त्यातच आता या शोच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिल्या पर्वाप्रमाणेच या पर्वामध्येही घरातील सदस्यांमध्ये दोन गृप तयार झाले आहेत. त्यात एका गृपमध्ये पराग, वीणा, किशोरी,रुपाली आणि शिव हा एक गृप तयार झाला आहे. तर दुसऱ्या गृपमध्ये बिचुकले, सुरेखा,नेहा, अभिजीत, वैशाली आणि काही दिवसांपूर्वी आलेली हिना पांचाळ यांचा समावेश आहे. या दोन्ही गृपमध्ये आडूआडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. त्यातच आता परागने त्याला घरामध्ये वैशाली आणि अभिजीत नकोयेत असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी मी विणामुळे दुखावलो गेलोय आणि त्यामुळेच गृप सोडल्याचं परागने सांगितलं होतं. मात्र आता हा गृप मी विशिष्ट कारणामुळे सोडला असून दुसऱ्या गृपमध्ये जाऊन हाय नंबर क्रिएट करून मला आपल्या ग्रुपची जे टार्गेट आहेत त्यांना एलिमनेट करणे आवश्यक आहे म्हणून मी तिकडे गेलो, असं नवं कारण परागने दिलं आहे. मात्र त्याला घरामध्ये वैशाली आणि अभिजीत नको असल्यामुळे त्याने हा नवा डाव आखल्याचं पाहायला मिळत आहे.
परागला अभिजीत केळकर बिग बॉसच्या घरात नको असून तो त्याच्या नव्या ग्रुपमधील सदस्यांना घेऊन त्याला नॉमिनेट करण्याची योजना आखत आहे कारण त्याच्या मते त्याने त्यांचा ग्रुप तोडला आणि अभिजीतमुळेच त्यांच्या ग्रुपमधील सदस्य म्हणजेच शिव नॉमिनेट झाला. अशी अनेक कारणं देत तो दुसऱ्या गृपची दिशाभूल करत आहे. पण आता परागची योजना माधव आणि इतर सदस्यांना कळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First Published on June 20, 2019 5:24 pm

Web Title: bigg boss marathi 2 parag kanhere vishali made and abhijit kelkar war ssj 93
Just Now!
X