20 November 2019

News Flash

Bigg Boss Marathi 2 : आता शिव-वीणा एकमेकांशी बोलणार नाहीत ?

या दोघांच्या मैत्रीचे किस्से घरातच नाही तर प्रेक्षकांमध्येही रंगत आहेत

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वामध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारी जोडी म्हणजे शिव आणि वीणा. या दोघांच्या मैत्रीचे किस्से घरातच नाही तर घराबाहेर प्रेक्षकांमध्येही रंगत आहेत. मात्र आता या दोघांनी एकमेकांशी कमी बोलण्याचा किंबहुना बोलणं बंद करण्याचा निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

शिव आणि वीणा एकमेकांचे चांगले मित्र झाले असून त्यांच्या या मैत्रीचा परिणाम थेट त्यांच्या टास्क खेळण्यावर आणि घरातील एकंदरीत वातावरणावर होत आहे. त्यामुळे रविवारी (२१ जुलै) रंगलेल्या विकेंडच्या डावामध्ये महेश मांजरेकर यांनी या दोघांची कानउघडणी केल्याचं पाहायला मिळालं. महेश मांजेरकर यांनी घेतलेल्या शाळेनंतर आता हे दोघं आपआपसात चर्चा करत असून एकमेकांशी कमी बोलण्याचा किंवा न बोलण्याचा निर्णय ते घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मर्डर मिस्ट्री या टास्कमध्ये शिवला वीणाचा टॉप नष्ट करण्यास सांगितला होता. मात्र त्याने हा टास्क करण्यास नकार दिला. त्यावरुन त्याला महेश मांजरेकरांनी खडेबोल सुनावले होते. तर अभिजीत केळकरनेही त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला होता. वीणाला मदत करण्याच्या नादात तू तिचंदेखील नुकसान करत आहेस, असं अभिजीतने शिवला सांगितलं होतं. त्यानंतर आता शिव आणि वीणा त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिव आणि वीणा खरंच अबोला धरणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First Published on July 22, 2019 1:39 pm

Web Title: bigg boss marathi 2 shiv veena friendship ssj 93
Just Now!
X