News Flash

नेहामुळे माधव घराबाहेर? शिवानीचा आरोप

या दोघींनीही एकमेकींशी न बोलण्याचा निर्णय घेतला आहे

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये जीवाभावाची मैत्री असलेल्या नेहा आणि शिवानीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. एका गैरसमजामुळे या दोघींमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे याच्या भांडणाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेला माधव देवचके कारणीभूत ठरला आहे.

बिग बॉसच्या घरात नुकत्याच रंगलेल्या कॅप्टनसीच्या टास्कमध्ये नेहा शितोळे विजयी झाली असून ती घरातील नवीन कॅप्टन झाली आहे. नेहा कॅप्टन झाल्यानंतर तिने घरातल्यांची एक मिटींग घेतली. या मिटींगमध्ये तिने प्रत्येक सदस्याला घरातील काम वाटून दिली आहेत. मात्र अभिजीत बिचुकले यांना सोपवलेलं काम त्यांनी नाकारल्याचं पाहायला मिळालं. अभिजीतने काम करण्यास नकार दिल्यामुळे घरात एकच गोंधळ उडाला. हे प्रकरण सोडविण्यासाठी नेहा आणि शिवानीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.मात्र यामध्ये नेहा आणि शिवानीमध्येच नवा वाद सुरु झाला. या वादात शिवानीने नेहावर अनेक आरोप केले. त्यात माधव घरातून बाहेर जाण्यामागे नेहा कारणीभूत असल्याचा आरोप शिवानीने केला आहे.

दरम्यान, नेहा आणि शिवानीमध्ये वाद झाल्यानंतर या दोघींनीही एकमेकींशी न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी असलेल्या या दोघी किती दिवस एकमेकींशी न बोलता राहू शकतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 2:43 pm

Web Title: bigg boss marathi 2 shivani alligation neha madhav ssj 93
Next Stories
1 नेहा धुपियाने शेअर केला स्तनपान करतानाचा फोटो, लिहिली भावनिक पोस्ट
2 अटकेच्या व्हिडीओवर सोनाक्षी सिन्हा म्हणते…
3 तुम्ही संकटात असताना नाटकाचा प्रयोग करणं योग्य नाही- सुबोध भावे
Just Now!
X