20 November 2019

News Flash

Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वे पुन्हा येणार बिग बॉसच्या घरात ?

येत्या विकेन्डच्या डावात शिवानी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात येईल असे सांगण्यात येत आहे.

शिवानी सुर्वे

बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व चांगलेच गाजत आहे. घरात नवनवीन टास्क रंगत आहेत आणि जो तो आपापल्या परीने बिग बॉसचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. याच पर्वात अभिनेत्री शिवानी सुर्वेची खूप चर्चा झाली होती. स्पष्टवक्तेपणाने आपला मुद्दा मांडणे, घरामध्ये अनेक वेळा वाद घालणे आणि तेवढ्याच ताकदीने दिलेला टास्क पूर्ण करणे यासाठी शिवानी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय होती.

काही आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या या कार्यक्रमाने अल्पावधीच रंजक वळण घेतले होते. या शो मधील शिवानी सुर्वे, अभिजित बिचुकले आणि पराग कान्हेरे या स्पर्धकांना काही कारणांसाठी बिग बॉसच्या घरातून काढून टाकण्यात आले होते. परंतु येत्या विकेन्डच्या डावात शिवानी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात येईल असे सांगण्यात येत आहे.

तब्येतीच्या तक्रारींमुळे शिवानी बिग बॉसच्या घरातून बाहेर गेली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया.कॉम’शी बोलताना तब्येत ठीक झाल्यानंतर पुन्हा शो मध्ये जाण्याची तिची इच्छा आहे असे ती म्हणाली होती.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी शिवानीला पुन्हा घरात येण्यासाठी विचारले आहे. ती या आठवड्याच्या शेवटी बिग बॉसच्या घरात येऊ शकते. शिवानी स्पर्धक म्हणून येणार आहे की पाहुणी म्हणून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवानीच्या पुन्हा येण्याने कार्यक्रमाला वेगळेच वळण मिळू शकते.

First Published on July 12, 2019 6:03 pm

Web Title: bigg boss marathi 2 shivani surve back djj 97
Just Now!
X