12 July 2020

News Flash

शिवानी चढणार बोहल्यावर? घरात सुरु झाली लगीनघाई

बांधणार या व्यक्तीसोबत लग्नगाठ

‘देवयानी’ या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे हे नाव आता कोणत्याही प्रेक्षकाला नवीन नाही. ‘देवयानी’मध्ये साधी,सोज्वळ पण तितकीच कणखर अशी भूमिका साकारणारी शिवानी प्रत्यक्ष आयुष्यात अत्यंत निराळ्या स्वभावाची आहे. आपली मत ठामपणे न डगमगता मांडणारी शिवानी तिच्या याच स्वभावामुळे सध्या चर्चेत येत आहे. ‘बिग बॉस मराठी २’मध्ये सहभागी झालेली शिवानी पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिली आहे. त्यामुळेच तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. काही दिवसापूर्वी शिवानीने खऱ्या आयुष्यामध्ये अजिंक्य नामक तरुणाला डेट करत असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून घरातले सदस्य आणि चाहते अजिंक्यविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे आता शिवानीने अजिंक्यबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या असून आता घरातील सदस्यांनी शिवानीच्या लग्नाची तयारी सुरु केली आहे.

वूटवरील ‘अनसीन अनदेखा’च्या क्लिपमध्ये घरात रंगणाऱ्या अनेक गोष्टी दाखविल्या जातात. त्यातल्याच एका क्लिपमध्ये घरातील सदस्य आता शिवानीला अजिंक्यसोबत लग्न करण्यासाठी तयार करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच अजिंक्यने अजूनही मला लग्नाची मागणी घातली नाही, असं शिवानीने घरातल्यांना सांगितलं. त्यामुळेच आता घरातला प्रत्येक सदस्य तिला अजिंक्यचं मन वळविण्यासाठी काही टिप्स देताना दिसून येत आहेत.

माझं लग्न व्हावा यासाठी माझी आई सतत माझ्या मागे लागलेली असते. कोणतंही नवीन स्थळ आलं की आई लगेच मला येऊन सांगते. या ‘स्थळाचं आता काय करु’? असा प्रश्न आईचा असतो. तिच्या या प्रश्नामागे तुझं नक्की काय सुरु आहे ते सांग असा मतितार्थ असतो, असं शिवानी सांगते. तिच्या या वक्तव्यावर ‘आता हेच तुझं लग्नासाठी योग्य वय असल्याचं” आरोह म्हणतो आणि लगेच “काय म्हणतेस नेहा?” असं विचारत या चर्चेमध्ये नेहाला सहभागी करुन घेतो. यावर “मला अजून अजिंक्‍यने लग्‍नासाठी प्रपोज केलेलं नाही !”, असं म्हणत शिवानीने सांगितलं.

दरम्यान, याबाबत नेहा तिच्‍या वयाबाबत चौकशी करत सल्‍ला देते, ”आता तुला २४ वं लागेल ना ! त्यामुळे २५ व्या वर्षापर्यंत लग्न केलंस तर तुला त्या घरात अॅडजेस्ट व्हायला जास्त सोपं होईल. जेवढा उशीर लावशील तेवढंच तिथे मॅनेज करणं कठीण जाईल हे मी माझ्या अनुभवावरुन सांगते, असं नेहा म्हणाली. त्यावर ”मी अजिंक्‍यच्‍या मम्‍मी, पप्‍पांबरोबर अॅडजस्‍ट केलेलं आहे, असं शिवानीने सांगितलं. त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याला शिवानीच्या लग्नाचे वेध लागले असून त्यांनी एकप्रकारे आताच शिवानीच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 6:41 pm

Web Title: bigg boss marathi 2 shivani surve marriage gossip shivani dating ajinkya ssj 93
Next Stories
1 राष्ट्रीय पुरस्कारानंतर आयुषमानने वाढवलं मानधन; एका जाहिरातीसाठी घेणार इतके कोटी रुपये
2 …तर मिकानंतर सलमान खानवरही येणार बंदी?
3 लोक मला बोल्ड भूमिकेसाठीच फोन करतात – माही गिल
Just Now!
X