News Flash

Bigg Boss 2 : वीणा-वैशालीमध्ये उडणार वादाचा भडका

घरातील अनेक सदस्यांमध्ये खटके उडताना दिसत आहेत

छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वामध्ये आता खऱ्या अर्थाने रंगत चढली आहे. घरामध्ये नवनवीन डाव रंगू लागले असून सध्या पोपटाचा पिंजरा हा टास्क सुरु आहे. या टास्कमध्ये घरातील अनेक सदस्यांमध्ये खटके उडताना दिसत आहेत. आतापर्यंत घरामध्ये अभिजीत बिचुकले-रुपाली भोसले, पराग कान्हेरे- शिवानी शिंदे आणि वीणा जगताप -विद्याधर जोशी यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता घरामध्ये पुन्हा दोन सदस्यांमध्ये भांडण होताना दिसणार आहे.

बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर शांत आणि तितकीच संयमी वाटणारी विणा जगतापने आता बिग बॉसचा किताब जिंकण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे घरामध्ये अनेक वेळा ती स्वत:ला सिद्ध करताना, तिचे विचार स्पष्टपणे मांडताना दिसून येते. अशाच आता विणाचं पुन्हा एकदा घरातल्या सदस्यासोबत भांडण होताना दिसणार आहे. आजच्या भागात वीणा आणि वैशाली या दोघींचं भांडण होताना दिसणार आहे, मात्र हे भांडण नक्की कोणामुळे झाले ते आजच्या भागातच पाहायला मिळेल.

वैशाली आणि वीणा या दोघींमध्ये बोलण्याच्या शैलीवरुन, भाषेवरुन भांडण झाल्याचं पाहायला मिळणार आहे. वैशालीने रुपालीशी बोलताना केलेल्या शब्दांच्या गैरवापरामुळे वीणा आणि वैशालीमध्ये वादाची ठिणगी पडली आणि हा वाद वाढत गेला. ज्यामध्ये वैशालीने वीणाला बरच काही सुनावले आहे.

आता हे भांडण का झाले ? कोणामुळे झाले ? पुढे काय होईल ? हे आजच्या भागामध्ये कळेलच… तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 4:12 pm

Web Title: bigg boss marathi 2 veena and vaishali war
Next Stories
1 Bigg Boss Marathi 2 : सगळे सदस्य होणार का नॉमिनेट?
2 ‘भारत’ सोडून प्रियांकाने घेतला धाडसी निर्णय- सलमान
3 दत्तगुरुंचा महिमा सांगणारी पौराणिक मालिका ‘श्री गुरुदेव दत्त’
Just Now!
X