News Flash

‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूर अडकली विवाहबंधनात

सईने मोठ्या थाटामाटात तिर्थदीप रॉयसोबत बांधली लग्नगाठ

‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूर अखेर विवाहबंधनात अडकली आहे. सईने मोठ्या थाटामाटात तिर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सईच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. लग्नकार्यातील प्रत्येक सोहळ्याचे, कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सई सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत होती. आज अखेर तिने तिर्थदीपसोबत लग्नगाठ बांधली आहे.

सोमवारी ( ३० नोव्हेंबर) सकाळी ९.५४ वाजता सई आणि तिर्थदीप यांचा मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. २९ नोव्हेंबर रोजी सई-तिर्थदीप यांच्या लग्नाचं देवकार्य पार पडलं होतं. त्याचेदेखील फोटो सईने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

२ ऑक्टोबर २०२०२ रोजी सई व तीर्थदीप यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यावेळी सईने तिर्थदीपसाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हीच खरी सगळ्याची सुरुवात आणि शेवट आहे, असं कॅप्शन सईने या फोटोला दिलं होतं.

पाहा फोटो >> लग्नघरात सईचे लाड…केळवण, नट्टाफट्टा आणि बरचं काही

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

पाहा फोटो >> धमाल आणि मजा-मस्ती, सई लोकूरच्या बॅचलरेट पार्टीचे फोटो पाहिलेत का?

दरम्यान, सई आणि तिर्थदीप यांची ओळख एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरुन झाली होती. याविषय़ी तिने ‘ई टाइम्स’ला मुलाखतदेखील दिली होती. “गेल्या दोन वर्षांपासून मी मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर माझ्या ‘मिस्टर परफेक्ट’ला शोधत होती. तिर्थदीप आणि माझी ओळखसुद्धा मॅट्रिमोनिअल साइटवरूनच झाली आणि ऑगस्टपासून आम्ही बोलू लागलो. काही दिवसांतच आम्हाला एकमेकांचा स्वभाव आवडू लागला आणि एकमेकांविषयी आम्ही फार सकारात्मक होतो. त्यानंतर तो आईला घेऊन बेळगावला मला भेटायला आला. त्या भेटीतच आमचं लग्न ठरलं. खूप घाईत प्रत्येक गोष्ट घडली पण माझ्यासाठी हेच नातं असावं असं मला मनापासून वाटतंय,” असं सईने या मुलाखतीत सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 11:53 am

Web Title: bigg boss marathi actress sai lokur wedding tie knot with tirthadeep roy ssj 93
Next Stories
1 अभिनेता रजनीकांत आज मोठी घोषणा करण्याची शक्यता
2 ‘मला अभिनवपासून घटस्फोट हवा होता,पण…’; रुबिना दिलैकने केला धक्कादायक खुलासा
3 आशिकी फेम राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका, नानावटी रुग्णालयात दाखल
Just Now!
X