24 October 2020

News Flash

Bigg Boss Marathi : आस्तादच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण माहित आहे का?

आस्ताद त्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलणं सहसा टाळतो.

आस्ताद काळे

‘बिग बॉस मराठी’ हा रिअॅलिटी शो अंतिम टप्प्यात पोहोचला असून आता फक्त सहा स्पर्धक घरात राहिले आहेत. मेघा धाडे, पुष्कर जोग, आस्ताद काळे, सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत आणि स्मिता गोंदकर यांनी फायनलपर्यंत धडक मारली आहे. आता बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

बिग बॉसच्या घरात नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं या स्पर्धकांनी मनमोकळेपणाने दिली. याच परिषदेत आस्तादने त्याच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीबाबत खुलासा केला. खरंतर आस्ताद त्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलणं सहसा टाळतो. पण पत्रकार परिषदेत त्याने त्याच्या आयुष्यात असलेल्या खास व्यक्तीचे नाव घेतले. ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री स्वप्नाली पाटील. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर तुला सर्वांत आधी कोणाला भेटायचं आहे असं विचारलं असता आस्तादने तिचं नाव घेतलं. मला माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला म्हणजेच अभिनेत्री स्वप्नाली पाटीलला भेटायचं आहे, असं तो म्हणाला. ग्रँड फिनाले नंतर तो पुण्याला आईवडिलांकडे जाणार असून तिथेच स्वप्नालीला बोलावून घेणार असल्याचंही त्याने सांगितलं.

Bigg Boss Marathi : मेघा, पुष्कर की सई; कोण ठरणार विजेता?

पुढचे पाऊल या मालिकेत आस्ताद आणि स्वप्नालीने एकत्र काम केलं होतं. ते दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याचंही म्हटलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 1:35 pm

Web Title: bigg boss marathi astad kale reveals about the special person in his life
Next Stories
1 Bigg Boss Marathi : ‘या’ वादांमुळे बिग बॉस मराठी गाजलं
2 ‘त्या’ एका चुकीमुळे कार्तिक आर्यनला करणकडून डच्चू
3 Viral Video : सनी देओलच्या डान्सचा हा व्हिडियो पाहिलात? 
Just Now!
X