News Flash

Bigg Boss Marathi : स्पर्धेतून बाद करण्यासाठी सदस्य देणार प्रतिस्पर्धकांना मिरचीची धुरी

बिग बॉस आज सदस्यांवर आज बॉक्स – अनबॉक्स हे कार्य सोपवणार आहे.

'बिग बॉस मराठी'

बिग बॉस मराठीच्या घरात काल (गुरुवारी) बिग बॉसचा वाढदिवस साजरा करण्याचं हटके कार्य रंगलं आणि रिटर्न गिफ्ट म्हणून सदस्यांना ‘टिकिट टू फिनाले’ मिळणार असल्याचं घोषित केलं. ज्याला हे तिकिट मिळणार तो थेट महाअंतिम फेरीत पोहोचणार आहे. त्यामुळे फिनालेचं हे तिकिट कोणाला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. गुरुवारी मेघा धाडे ‘टिकिट टू फिनाले’ या रेसमधून बाद झाली.

घरातील इतर सदस्य आपल्याविषयी मागे काय बोलतात याची झलक घरातल्या प्रत्येक सदस्याला बघण्याची संधी मिळाली. पुष्कर, सई आणि रेशमला मेघा त्यांच्यामागे काय बोलली हे दाखविण्यात आलं. हे बघितल्यानंतर घरातील सदस्य मेघाच्या विरोधात गेले आणि सगळ्यांनीच तिला जाब विचारायला सुरुवात केली. रेशमने मेघाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की, ती जे काही वैयक्तिक तिच्याबद्दल बोलली ते बोलायला नको होतं. तसेच सईने शर्मिष्ठाला आणि आस्तादने मेघाला जाब विचारला. पुष्कर आणि सई मेघावर काल बरेच नाराज झालेले दिसून आले. मेघा जे काही पुष्करबद्दल बोलली त्यावरून पुष्कर आणि सईने देखील मेघाचे नाव ‘टिकीट टू फिनाले’ या रेस मधून बाद होण्यासाठी घेतले.

Gul Makai Teaser : ‘मेरा नाम मलाला क्यूँ रखा?’

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांच्या प्रवासामध्ये स्पर्धा, मैत्री, प्रेम, धोका, अशा अनेक रंजक गोष्टी घडल्या आहेत. प्रत्येकाने स्वत:भोवती समज – गैरसमज याची चौकट आखून घेतली आहे. नेमकी हीच चौकट मोडून काढत स्वत:वर विजय मिळविण्यासाठी बिग बॉस आज सदस्यांवर आज बॉक्स – अनबॉक्स हे कार्य सोपवणार आहे. या कार्यामध्ये नक्की काय होणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या टास्कनुसार मेघा, आस्ताद आणि रेशम यांना मिळून शर्मिष्ठा, पुष्कर, स्मिता आणि सईला बॉक्समधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. या टास्कमध्ये कोण जिंकणार आणि कोणाला ‘टिकीट टू फिनाले’ मिळणार हे आजच्या भागात स्पष्ट होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 4:53 pm

Web Title: bigg boss marathi contestants opposes megha dhade latest updates
Next Stories
1 चारित्र्यहिन ‘संजू’वर राष्ट्रीय स्वयंसवेक संघाची टीका
2 BLOG : Imran Khan Affairs मैदानाबाहेरील ‘लव्ह गेमस्’
3 बिग बॉगमधली सर्वाधिक चर्चेत असलेली ही अभिनेत्री साकारणार ‘कोमोलिका’?
Just Now!
X