News Flash

Bigg Boss Marathi : मेघा आणि पुष्करमध्ये उडाली वादाची ठिणगी

हे वाद कसे मिटतील आणि कोणाला जास्त हिरे मिळतील हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

मेघा धाडे, पुष्कर जोग

बिग बॉस नेहमीच घरातील सदस्यांना नवनवीन सरप्राइज देत असतो. असंच एक सरप्राइज सदस्यांना काल (मंगळवारी) मिळालं. कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘घाडगे & सून’मधील सर्वांची लाडकी माई म्हणजेच सुकन्या कुलकर्णी मोने आणि वसुधा म्हणजेच अतिशा नाईक यांनी बिग बॉसच्या घरात हजेरी लावली. त्यासोबतच ‘घरोघरी मातीच्या चुली’ हे टास्क रंगलं.

या अनोख्या टास्कमध्ये पुष्कर, सई, मेघा, आस्ताद, नंदकिशोर आणि शर्मिष्ठा यांना बक्षिस म्हणून हिरे देण्यात आले. कारण, त्यांनी हे कार्य उत्तमरीत्या पार पाडले. आज देखील घरात हे कार्य रंगणार आहे. परंतु बिग बॉस मराठीच्या घरात आज वसुधाबरोबर असणार आहे घाडगे & सून मालिकेतील सगळ्यांची लाडकी अमृता. तेव्हा हे कार्य पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Gul Makai motion poster: मलालाची कहाणी मोठ्या पडद्यावर

मंगळवारी झालेल्या संघांमध्ये आज अदलाबदल करण्यात येणार आहे. टीम सून-जावयाचे नेतृत्व भाग्यश्री तर टीम सासू–सासऱ्याचं नेतृत्व अतिशा नाईक करणार आहे. यादरम्यान शर्मिष्ठा आणि सईमध्ये तर मेघा आणि पुष्करमध्ये बरेच वाद होणार आहेत. त्यामुळे हे वाद कसे मिटतील आणि कोणाला जास्त हिरे मिळतील हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 2:02 pm

Web Title: bigg boss marathi controversy between megha dhade and pushkar jog
Next Stories
1 India’s Best Dramebaaz : प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये सोनालीची जागा घेणार ही अभिनेत्री
2 ..म्हणूनच मल्लिकाचा चाहता तिला ठार मारणार होता
3 ‘शमशेरा’मध्ये रणबीरसोबत संजय दत्तही दिसणार?
Just Now!
X