रिअॅलिटी शोच्या हल्लीच्या दिवसांमध्ये एक गाजलेला कार्यक्रम म्हणजे ‘लाव रे तो व्हिडीओ’. या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं टॅलेंड पाहायला मिळतंय. घरातल्या घरात व्हिडीओ शूट करून एका लोकप्रिय वाहिनीवर झळकण्याची ही संधी अनेकांना मिळतेय. या कार्यक्रमातील आगामी भागात एक प्रसिद्ध मराठी अभिनेता लावणीच्या ठेक्यावर थिरकताना दिसणार आहे. त्याचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या अभिनेत्याने नऊवारी साडी नेसून धमाकेदार लावणी सादर केली. त्याच्या नृत्याने उपस्थितांचीही मनं जिंकली. हा अभिनेता आहे पुष्कर जोग. ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या आगामी भागात पुष्कर लावणी सादर करताना दिसणार आहे. या कार्यक्रमाचा पुढील आठवडा नामवंत कलाकारांसोबत रंगणार आहे.
आणखी वाचा : अनुप जलोटा-जसलीन यांनी केलं लग्न? फोटो पाहून नेटकरी अवाक्
निलेश साबळे ‘झी युवा’ वाहिनीवरील या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम तो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांसोबतच कलाकारांचा देखील हा कार्यक्रम आवडता झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 9, 2020 2:27 pm