News Flash

‘बिग बॉस मराठी’ फेम शर्मिष्ठा राऊतचा साखरपुडा; ३५ जणांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम

एप्रिल महिन्यात शर्मिष्ठाचा साखरपुडा पार पडणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ते शक्य झालं नव्हतं.

Sharmishtha Raut
शर्मिष्ठा राऊत

‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेत ‘संयोगिता’ हे पात्र रंगविणारी व ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिचा नुकताच साखरपुडा पार पडला. तेजस देसाई असं शर्मिष्ठाच्या जोडीदाराचं नाव असून इगतपुरी येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

एप्रिल महिन्यात शर्मिष्ठाचा साखरपुडा पार पडणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ते शक्य झालं नव्हतं. आता लॉकडाउनचे काही नियम शिथिल केल्याने साखरपुड्यासाठी हीच वेळ योग्य ठरू शकते, असा विचार करत दोघांनी २१ जून ही तारीख निश्चित केली. इगतपुरीमधल्या रिसॉर्टच्या क्लबहाऊसमध्ये हा साखरपुडा पार पडला असून त्याला केवळ ३५ जण उपस्थित होते. येत्या ऑक्टोबर महिन्यात शर्मिष्ठा व तेजस लग्न करणार असल्याचं कळतंय. मात्र तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. शर्मिष्ठाचं हे दुसरं लग्न असेल.

या साखरपुड्याला उपस्थित राहणाऱ्या सर्वांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात आल्याचं तिने सांगितलं. सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्ह्स या सर्वांची व्यवस्था तिथे करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 12:53 pm

Web Title: bigg boss marathi fame sharmishtha raut to get engaged ssv 92
Next Stories
1 BLOG : ज’बाप’दारी
2 सारामुळे अस्वस्थ होता सुशांत; ‘केदारनाथ’च्या दिग्दर्शकाचा खुलासा
3 अक्षयला फोटोशूट करताना वॉचमनने दिलं होतं हाकलून; त्याच ठिकाणी घेतलं स्वत:चं घर
Just Now!
X