06 March 2021

News Flash

Bigg Boss Marathi : विजेतेपदासाठी ‘या’ स्पर्धकाला प्रेक्षकांची पसंती

Bigg Boss Marathi, बिग बॉस मराठीच्या अंतिम फेरीच्या निमित्ताने लोकसत्ता ऑनलाइनने घेतलेल्या पोलमध्ये चाहते म्हणत आहेत....

bigg boss marathi, बिग बॉस मराठी

Bigg Boss Marathi. ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम सुरु होण्यापासूनच त्याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली होती. हा कार्यक्रम प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये त्याविषयीची उत्सुकता आणि कुतूहल अक्षरश: शिगेला पोहोचली होतं. ज्यानंतर प्रत्येक भागामध्ये घरातील स्पर्धकांमध्ये होणारी स्पर्धा आणि त्यांच्यातील वाद या कार्यक्रमाला नवी वळणं देऊन गेलं.

महेश मांजरेकर यांची दमदाटी, घरात होणारे टास्क, मनाविरुद्ध कराव्या लागलेल्या काही गोष्टी या साऱ्या माहोलात आता बिग बॉस मराठीचा प्रवास शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. अंतिम फेरीसाठी या घरामध्ये मेघा धाडे, पुष्कर जोग, सई लोकूर, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर, शर्मिष्ठा राऊत या सेलिब्रिटी स्पर्धकांचा समावेश आहे. त्याच धर्तीवर लोकसत्ता ऑनलाईनने सोशल मीडियावर एक पोल पोस्ट केला होता. ज्यामध्ये वाचकांनी त्यांच्या आवडत्या स्पर्धकाच्या नावावर शिक्कामोर्तब करत बिग बॉसच्या विजेतेपदाचं नाव स्पष्ट केलं आहे.

ज्यामध्ये आस्ताद काळे आणि मेघा धाडे यांच्या नावांना अनेकांनीच पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात मेघाचा आतापर्यंतचा प्रवास आणि तिची रणनिती पाहता तिच्या नावाला तुलनेने जास्त पसंती देण्यात आली आहे. तर कोणी स्मिताच्या नावालाही पसंती दिली आहे. स्मिताच्या नावालाही काही प्रेक्षकांनी पसंती देत ती या खेळात विजेती ठरत सर्वाँनाच आश्चर्याचा धक्का देऊ शकते असंही म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊया प्रेक्षक बिग बॉसच्या स्पर्धकांबद्दल म्हणतायेत तरी काय….


वाचा : ‘लस्ट स्टोरीज’ : तिच्या ‘लालसे’ची चाकोरीबाहेरची चिकित्सा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 1:16 pm

Web Title: bigg boss marathi finale finalists megha dhade smita gondkar audience poll
Next Stories
1 Dhadak Movie : जान्हवीच्या बहिणीची ‘खुशी’ गगनात मावेना, ‘झिंगाट’वर धरला ठेका
2 मुसळधार पाऊस आणि पूरावर मात करत ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे महत्त्वपूर्ण चित्रीकरण
3 चाहत्यांच्या उदंड प्रतिसादात ‘फर्जंद’ने गाठली पन्नाशी
Just Now!
X