26 November 2020

News Flash

Bigg Boss Marathi Grand Finale : शर्मिष्ठानंतर ग्रँड फिनालेमधून आस्ताद काळे बाहेर

Bigg Boss Marathi Grand Finale : विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Bigg Boss Marathi Grand Finale : आस्ताद काळे

Bigg Boss Marathi Grand Finale : शर्मिष्ठा राऊतनंतर आस्ताद काळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडला आहे. ग्रँड फिनालेकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं असून आता विजेता कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंतिम फेरीत पोहोचलेल्या सहा स्पर्धकांपैकी सर्वांत आधी शर्मिष्ठा बाद झाली. त्यापाठोपाठ आस्ताद बाहेर पडला. त्यामुळे आता घरात फक्त चार स्पर्धक राहिले आहेत. मेघा धाडे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर आणि सई लोकूर यांच्यामध्ये ही चुरस आहे.

बिग बॉसच्या घरातील आस्तादचा आतापर्यंतचा प्रवास थक्क करणारा होता. पुरुषांपैकी आस्ताद आणि पुष्कर या दोघांनी ग्रँड फिनालेपर्यंत मजल मारली. आस्तादला पुष्करची जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली. कारण लोकप्रियता आणि बिग बॉसच्या घरातील वावर पाहता पुष्कर नेहमीच आस्तादपेक्षा उजवा ठरला.

Bigg Boss Marathi : ‘ग्रँड फिनाले’मध्ये सई- पुष्करची रोमॅण्टिक केमिस्ट्री

आस्तादच्या एक्झिटनंतर ग्रँड फिनालेची उत्सुकता अधिकच वाढली असून विजेतेपद कोण पटकावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2018 8:46 pm

Web Title: bigg boss marathi grand finale second eviction from the show is astad kale
टॅग Bigg Boss Marathi
Next Stories
1 Bigg Boss Marathi Grand Finale : शर्मिष्ठा बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर
2 Bigg Boss Marathi: शर्मिष्ठापाठोपाठ आस्ताद आणि सईसुद्धा घराबाहेर?
3 Bigg Boss Marathi: या पाच कारणांसाठी ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले ठरणार खास
Just Now!
X