21 October 2020

News Flash

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगणार ‘मस्ती की पाठशाला’!

'मस्ती की पाठशाला' या टास्कमध्ये सई आणि आस्ताद शिक्षक आणि इतर सदस्य विद्यार्थी होणार आहेत.

'बिग बॉस मराठी'च्या घरात रंगणार 'मस्ती की पाठशाला'!

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून रेशम टिपणीस बाहेर पडली. बिग बॉसने दिलेल्या विशेष अधिकारानुसार रेशमने आस्तादला या आठवड्यामधील नॉमिनेश प्रक्रियेतून वाचवलं. त्यामुळे पुष्करसोबत आता आस्ताददेखील अंतिम फेरीत पोहोचला आहे. आज (सोमवार) बिग बॉस मराठीच्या घरात एक अनोखा आणि तितकाच मजेशीर टास्क रंगणार आहे.

अंदाजे तीन महिने बिग बॉसच्या घरात एकत्र राहिल्यानंतर प्रत्येकजण एकमेकांकडून काही ना काही शिकला आहे. यावरच आजचा टास्क आधारित असेल. बिग बॉसच्या घरात मान्सून शाळा भरणार आहे. आता शाळा म्हटली की वर्गात दबदबा असलेला मॉनिटर, पहिल्या बाकावर बसणारी हुशार मुलं, शेवटच्या बाकावर बसून दंगा घालणारी मुलं, असे नानाविध प्रकारचे विद्यार्थी असतात. ‘मस्ती की पाठशाला’ या टास्कमध्ये सई आणि आस्ताद शिक्षक आणि इतर सदस्य विद्यार्थी होणार आहेत.

Bigg Boss Marathi : रेशमला ही चूक पडली महागात?

रविवारी पार पडलेल्या ‘वीकेंडचा डाव’मध्ये महेश मांजरेकर यांनी प्रत्येक सदस्याला एक सदस्य निवडण्यास सांगितलं होतं, ज्या सदस्याला ती व्यक्ती त्याच्यासोबत अंतिम सोहळ्यामध्ये बघायची इच्छा आहे. यात शर्मिष्ठाने मेघाचं नाव तर मेघाने शर्मिष्ठाचं नाव घेतलं. तर दुसरीकडे आस्तादने स्मिताचं नाव, स्मिताने रेशमचं नाव आणि रेशमने शर्मिष्ठाचं नाव घेतलं. तर सईने पुष्करचं नाव आणि पुष्करने मेघाला निवडलं. यावरूनच सई आणि पुष्कर मेघावर नाराज होणार आहेत. आजच्या भागात या संदर्भातल्या घडामोडी पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 3:22 pm

Web Title: bigg boss marathi latest updates masti ki pathshala task for today
Next Stories
1 photos : ‘या’ शहरात होणार कतरिनाचं बर्थडे सेलिब्रेशन
2 Bigg Boss Marathi : रेशमला ही चूक पडली महागात?
3 ..म्हणूनच न्युयॉर्कच्या रस्त्यावर थिरकली प्रियांकाची पावले
Just Now!
X