१ मे म्हणजे महाराष्ट्र दिन..आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचा दिवस. हा दिवस बिग बॉस मराठीच्या घरातही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. घरातील मंडळी मराठमोळ्या पोशाखात दिसणार असून रेशम, मेघा, स्मिता आणि जुई या नववारी साडीत पाहायला मिळणार आहेत. तर पुरुषांनी फेटा, झब्बा असा पोशाख परिधान केला आहे. विशेष म्हणजे घरातून एलिमिनेट झालेले सदस्यदेखील हा दिवस साजरा करण्यासाठी बिग बॉसच्या घरात जाणार आहेत.
‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातील प्रसेनजीत कोसंबी बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहे. प्रसेनजीत त्याच्या खड्या आणि भारदस्त आवाजामुळे घराघरात पोहोचला. महाराष्ट्र दिनानिमित्त बिग बॉसच्या घरात तो ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं गाणार आहे. आस्ताद काळेदेखील त्याच्यासोबत जयोस्तुते हे गीत गाणार आहे. आस्तादसुद्धा उत्तम गायक असून बऱ्याचदा बिग बॉसच्या घरात तो गाणी गाताना पाहायला मिळतो. तर रेशम टिपणीस आणि स्मिता गोंदकर ‘पिंगा’ या गाण्यावर ठेका धरणार आहेत.
Megha च्या मते Resham व्हॅम्प… पाहा काय म्हणाली ती…#BiggBossMarathi सोम-शनि रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. #BBMarathi @meghadhade @jogpushkar #ReshamTipnis #SaiLokur @manjrekarmahesh @BiggBossMarathi pic.twitter.com/NOdYhMBFqO
— Colors Marathi (@ColorsMarathi) April 30, 2018
अभिनेता प्रियदर्शन जाधव त्याचा आगामी ‘सायकल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये हजेरी लावणार आहे आणि सर्वांसोबत धमाल मस्ती करणार आहे. स्पर्धकांना तो काही आगळ्यावेगळ्या भेटवस्तूही देणार आहे. तेव्हा आजचा बिग बॉस मराठीचा ‘महाराष्ट्र दिन विशेष’ भाग पाहायला विसरू नका.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2018 1:04 pm