बिग बॉस मराठीच्या घरात कालदेखील (गुरुवार) ‘घरोघरी मातीच्या चुली’ हे कार्य रंगलं. मात्र काल संघांमध्ये अदलाबदल करण्यात आली. टीम सून – जावयाचे नेतृत्व भाग्यश्री तर टीम सासू – सासऱ्यांचं नेतृत्व अतिशा नाईक यांनी केलं. त्यात शर्मिष्ठा आणि सईमध्ये तर मेघा आणि पुष्करमध्ये बरेच वाद झाले. रेशमने स्मिताला दिलेली सगळी कामं तिनं उत्तमरित्या पार पाडली. ज्यांनी हे कार्य उत्तमरीत्या पार पाडलं त्यांना हिरे देण्यात आले. मेघा, सई आणि पुष्कर यांचं त्रिकुट प्रेक्षकांना चांगलंच आवडत होतं. पण गेल्या आठवड्यापासून त्यांच्यामध्ये बरेच वाद होत आहेत. हे वाद काल देखील दिसून आले. सईला मेघाचं म्हणणं पटत नाही तर पुष्करला मेघाचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाही. आजदेखील (शुक्रवार) हा वाद विकोपाला जाणार असून पुष्कर, मेघा, सई, आस्ताद आणि रेशम यांच्यामध्ये बरेच वाद होणार आहेत. परंतु या वादामध्ये नक्की कोण माघार घेईल, घराचा नवा कॅप्टन कोण होईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात बरेच वादविवाद होत आहेत. ज्यामध्ये पुष्कर, मेघा आणि सई यांच्यातील वाद आता चर्चेचा विषय बनला आहे. मेघाने काल सईशी आणि शर्मिष्ठाशी बोलताना हेदेखील स्पष्ट केले की, आता पुष्कर आणि तिच्यातील मैत्री परत पहिल्यासारखी होऊ शकत नाही. आज (शुक्रवार) कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी मेघा, शर्मिष्ठा, स्मिता आणि नंदकिशोर यांच्यामध्ये वाद होणार आहे.
काय केलं Megha ने ज्यामुळे संपूर्ण घरंच तिच्या विरोधात गेलं? पाहा, #BiggBossMarathi सोम-शनि. रात्री 9.30 वा. फक्त #ColorsMarathi वर…
Follow करा #BiggBossMarathi चं official account: @biggbossmarathi@AastadKale @meghadhade @jogpushkar #SharmishthaRaut #NandkishorChaugule pic.twitter.com/PqwTjEN3EL
— Colors Marathi (@ColorsMarathi) July 6, 2018
या आठवड्याचे कॅप्टनसीचे कार्य महेश मांजरेकर यांनी आखून दिले आहे. आज घरामध्ये हटके पद्धतीने पूल व्हॉलीबॉल खेळण्यात येणार आहे. या कार्यानिमित्त घरातील सदस्यांची चार टीम्समध्ये विभागणी करण्यात येणार आहे. तेव्हा आता बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण बनेल हे बघणं रंजक ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 6, 2018 5:55 pm