16 February 2019

News Flash

Bigg Boss Marathi : ..म्हणून पुष्कर करणार चक्क लावणी!

बिग बॉसच्या घराचं BB हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे.

पुष्कर जोग

बिग बॉस मराठीच्या घरात काल (सोमवार) ‘पैसा फेक तमाशा देख’ हे नॉमिनेशन कार्य रंगलं. या कार्यानिमित्त घरात बैलगाडी ठेवण्यात आली. सर्व सदस्यांना १४व्या आठवड्याकडे नेणारं हे कार्य होतं. सई कॅप्टन असल्याने ती सुरक्षित होती. काल (सोमवार) नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये रेशम, आस्ताद आणि स्मिता नॉमिनेट झाले तर मेघा, शर्मिष्ठा, पुष्कर हे या आठवड्यामध्ये सुरक्षित आहेत. तेव्हा आता पुढील आठवड्यात कोण घराबाहेर जाणार, कोणते टास्क सदस्यांना मिळणार, कोण सुरक्षित होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आज (मंगळवार) बिग बॉस मराठीच्या घरात कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील आणि राधा म्हणजेच विणा जगताप येणार आहेत. तसंच ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेतील आर्वी म्हणजेच सुरभी हांडे आणि मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे हे कलाकारसुद्धा हजेरी लावणार आहेत.

Photos: आजारपणातील सोनालीचा हा मेकओव्हर तुम्हाला आवडेल!

‘अतिथी देवो भव’ म्हणजेच पाहुणचार हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आज बिग बॉसच्या घरात आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य अनोख्या पद्धतीने व्हावं यासाठी बिग बॉसचे BB हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. सर्व सदस्यांनी मिळून हे कार्य करायचं असं बिग बॉस सांगणार असून सई घराची कॅप्टन असल्यानं या हॉटेलची ती व्यवस्थापक असणार आहे. BB हॉटेलमध्ये अतिथी म्हणून ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतील प्रेम म्हणजेच सचित पाटील आणि राधा म्हणजेच विणा जगताप येणार आहेत आणि घरातील सदस्यांना त्यांचा पाहुणाचार करायचा आहे. पाहुण्यांचं मनोरंजन करण्यासाठी पुष्कर एक छान लावणीदेखील सादर करणार आहे. तेव्हा हे सदस्य मिळून BB हॉटेलमध्ये आलेल्या अतिथींची कशी काळजी घेणार, कोणते कोणते टास्क त्यांना मिळणार हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

 

First Published on July 10, 2018 4:16 pm

Web Title: bigg boss marathi pushkar jog will perform lavni in bigg boss house