15 January 2021

News Flash

Bigg Boss Marathi : ‘ग्रँड फिनाले’मध्ये सई- पुष्करची रोमॅण्टिक केमिस्ट्री

या दोघांच्या केमिस्ट्रीची आजवर खूपच चर्चा रंगली आहे.

सई लोकूर, पुष्कर जोग

बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले आज (रविवार) संध्याकाळी सात वाजल्यापासून रंगणार आहे. सर्व स्पर्धकांनी याची जय्यत तयारी केली असून एकाहून एक धमाकेदार डान्स परफॉर्मन्स आपल्याला ग्रँड फिनालेमध्ये पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे सई लोकूर आणि पुष्कर जोग यांची रोमॅण्टिक केमिस्ट्रीसुद्धा ग्रँड फिनालेमध्ये अनेकांचं लक्ष वेधून घेणार आहे.

सई आणि पुष्कर चांद मातला या गाण्यावर एकत्र डान्स करणार आहेत. या दोघांच्या केमिस्ट्रीची आजवर खूपच चांगली चर्चा रंगली आहे. त्या दोघांमध्ये खूपच छान मैत्री असून कार्यक्रमात पुष्कर आणि सई दोघे सतत एकत्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एवढंच नव्हे तर ते दोघे एकमेकांना पहिल्या भागापासून मदत करताना दिसून आले आहेत.

Bigg Boss Marathi : १०० टक्के मेघाच जिंकणार, पतीचा विश्वास

बिग बॉस मराठीच्या घरात नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेच्या दरम्यान सईला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तरावर सगळ्यांना हसू आलं. सईला विचारण्यात आलं होतं की, पुष्कर आणि तुझी केमिस्ट्री खूप चांगली आहे. जर पुष्करचं लग्न झालं नसतं तर त्याचा तू विचार केला असतास का? यावर हसत सई म्हणाली की, मी अनेकवेळा मस्करीत बोलते की, माझी बस सुटलेली आहे. हा पण पुष्करचं लग्न झालं नसतं तर मी ही बस नक्कीच पकडली असती. यावेळी पुष्करला देखील हाच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर माझं लग्न झालं असून मला एक गोड मुलगी आहे. मी माझ्या संसारात खूपच खूश आहे. पण माझं लग्न झालं नसतं तर मी नक्कीच सईचा विचार केला असता, असं उत्तर पुष्करने दिलं होतं.

ग्रँड फिनालेमध्ये मेघा – शर्मिष्ठा पिंगा या गाण्यावर ठेका धरणार आहेत. तर आस्ताद आणि स्मिता आली ठुमकत नार या गाण्यावर डान्स सादर करण्यात येणार आहेत. तसेच रेशम टिपणीस, जुई – ऋतुजा, राजेश, सुशांत आणि विनीत यांचाही धम्माकेदार डान्स पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2018 3:37 pm

Web Title: bigg boss marathi sai lokur and pushkar jog romantic dance performance in grand finale
टॅग Bigg Boss Marathi
Next Stories
1 तब्बल आठ वर्षानंतर ऐश्वर्या-अभिषेक एकत्र झळकणार
2 गाडीवरील ताबा सुटून तीन गाड्यांना धडक, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला पोलिसांच्या ताब्यात
3 video : ‘कसौटी जिंदगी की’ चा पहिलावहिला टीझर पाहिलात का?
Just Now!
X