23 November 2020

News Flash

पुन्हा होणार कल्ला, पुन्हा होणार राडे.. ‘बिग बॉस मराठी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बिग बॉसच्या घरात टास्क कसे रंगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस मराठी’चं तिसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बिग बॉसच्या घरात टास्क कसे रंगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बिग बॉसच्या घराच्या थीमविषयीसुद्धा उत्सुकता आहे.

बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी पार पडलं. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजय ठरली. पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दुसरं पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पर्वामध्ये शिव ठाकरेने ‘बिग बॉस मराठी 2’ ची ट्रॉफी जिंकली. हे दोन्ही पर्व प्रचंड गाजले. त्यामुळे आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालकसुद्धा महेश मांजरेकरच असतील का याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र दोन्ही पर्वातील त्यांचं सूत्रसंचालन प्रेक्षकांना व स्पर्धकांना फार आवडलं. त्यामुळे या तिसऱ्या पर्वातही त्यांचीच वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे यामध्ये कोणकोणते स्पर्धक असतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 10:48 am

Web Title: bigg boss marathi season 3 coming soon ssv 92
Next Stories
1 सुशांतच्या आजारपणाविषयी बहिणीला होती कल्पना?
2 ‘सिंगिंग स्टार’चे स्पर्धक लोकसत्ता डिजिटल अड्डावर
3 Video : गोपी बहु एका नव्या अंदाजात; ‘साथ निभाना साथिया २’चा टीझर प्रदर्शित
Just Now!
X