बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरचा ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो सध्या चर्चेत आहे. या शोमधील अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट ही जोडी चर्चेत आहे. राकेश बिग बॉसच्या घरात शमितासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राकेशने शमिताला फूट मसाज दिली होती. त्यांचा रोमँटिंक अंदाज पाहून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे म्हटले जात आहे. ते सतत एकत्र वेळ घालवताना दिसतात. पण राकेशच्या खिश्यात दिव्याचे लिपबाम पाहून शमिता त्याच्यावर चिडली आहे.

बिग बॉस ओटीटीचे सर्व स्पर्धक लिविंग एरियामध्ये बसलेले दिसत आहे. तेथे शमिता आणि राकेश बापट देखील असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात राकेशच्या खिश्यातील लिप बाम खाली पडते. ते प्रतिक सहजपालने उचलले आहे आणि त्याला ते शमिताचे आहे असे वाटते. घरातील इतर स्पर्धकही राकेला चिडवायला लागतात. तेव्हा राकेश सर्वांना सांगतो की हे लिपबाम शमिताचे नसून दिव्या अग्रवालचे आहे.

आणखी वाचा : श्रद्धा कपूरच्या लग्नाबाबत वडील शक्ती कपूर यांचा मोठा खुलासा, म्हणाले ‘रोहनने अजून…’

तेव्हा दिव्या सर्वांना सांगताना दिसते की तिच्याकडे एक एक्स्ट्रा होते त्यामुळे राकेशला दिले होते. ‘राकेशला गरज होती त्याने मागितले आणि मी दिले’, असे दिव्या म्हणाली. ते ऐकून शमिताला राग येतो. शमिता सर्वांना सांगते की मी राकेशची गर्लफ्रेंड नाही. मला चिडवणे बंद करा. तेवढ्यात दिव्या शमिताला म्हणते, ‘जर तू राकेशची गर्लफ्रेंड झालीस तर चांगलं होईल.’ ते ऐकून राकेश शमिताला विचारतो की असे काही होऊ शकते का? त्यावर शमिता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर याचा विचार करेन असे म्हणते.