News Flash

कार अपघातामध्ये शमिताने गमावला होता बॉयफ्रेंड, बिग बॉस ओटीटीच्या घरात केला खुलासा

शमिता आणि राकेश यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. मात्र, आता त्यांच्यात आलेल्या दुराव्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

shamita shetty
शमिताने 'बिग बॉस ओटीटी'मध्ये अनेक खुलासे केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून शमिता राकेश बापटसोबत असलेल्या तिच्या रोमान्समुळे चर्चेत होती. मात्र, विकेंड का वार पासून त्यांच्यात सतत वाद सुरु आहेत. त्यांच्यात भांडण झाल्यापासून राकेश आणि शमिता एकमेकांपासून लांब राहत आहेत. त्यात आता शमिताने ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये असलेली तिची मैत्रिण नेहा भसीनला तिच दुःख शेअर करताना दिसत आहे. शमिताने यावेळी खुलासा केला की तिचा पहिला बॉयफ्रेंडचा अपघात झाला होता आणि तेव्हा त्याचे निधन झाले.

या आधी निशांत आणि प्रतीकने ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात शमिता राकेशवर वर्चेस्व करण्याचा प्रयत्न करते असे बोलतात. त्यावर आता शमिताने वक्तव्य केलं आहे. हे ऐकून शमिता रागावली. तर राकेशने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही हे पाहता शमिताला वाईट वाटलंय. यावेळी शमिता नेहाला म्हणाली, ‘ती १८ वर्षांची असताना तिचा पहिल्या बॉयफ्रेंडचे निधन झाले. हेच कारण आहे की शमिताने तिच्या आयुष्यात इतके दिवस कोणालाही येऊ दिले नाही. बऱ्याच वर्षांनंतर, आता राकेशसोबत रिलेशनमध्ये येण्याचा प्रयत्न केला कारण राकेश तिला आवडतो.’

आणखी वाचा : ‘याला म्हणतात संस्कार’, बिग बींची नात आराध्याचा डान्सनंतर भजन गातानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by BigBosKhabri (@bigboskhabri)

आणखी वाचा : BB OTT : ‘मला मुल पाहिजे पण…’, शमिताने राकेशला सांगितली तिच्या मनातली इच्छा

त्यानंतर नेहा शमिताला समजावते की ‘राकेशने शमिताला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला आहे. ४ आठवड्यांपासून राकेश नेहमी तिला पाठिंबा देत आहे.’ दरम्यान, शमिताने अजुन लग्न केलेले नाही तर राकेश बापट आणि पत्नी रिद्धी डोगरा हे विभक्त झाले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 5:46 pm

Web Title: bigg boss ott shamita shetty told neha that she lost her first boyfriend in a car accident dcp 98
टॅग : Entertainment News
Next Stories
1 ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये पाहायला मिळणार गणेशोत्सवाचा उत्साह, बच्चेकंपनीने साकारली बाप्पाची मूर्ती
2 चाकूचा धाक दाखवून भर दिवसा अभिनेत्रीच्या घरात दरोडा
3 नेहा कक्करचे ‘कांटा लगा’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चेत
Just Now!
X