News Flash

“कृपया सोशल डिस्टंसिंग रखे…”; बिग बॉसच्या १४ व्या सीझनची भन्नाट थीम

येतोय बिग बॉसचा १४ वा सीझन

‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. या शोचा १३वा सीझन करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे अर्धावरच थांबवण्यात आला होता. निर्मात्यांच्या या निर्णयामुळे ‘बिग बॉस’ चाहते नाराज होते. या नाराज चाहत्यांना खुश करण्यासाठी शोचे १४ वे पर्व आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चकित करणारी बाब म्हणजे १४ व्या सीझनची थीम ‘सोशल डिस्टंसिंग’वर आधारित असणार आहे.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार ‘बिग बॉस’च्या मेकर्सने शूटिंगसाठी सरकारकडे विषेश परवानगी मागितली आहे. कारण या शोच्या निर्मितीसाठी त्यांना जवळपास ३०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. यामध्ये टेक्निशियन, एडिटर्स, लाईटमन, सफाई कर्मचारी अशी कामं करणाऱ्यांचा सामावेश असेल. नेहमी प्रमाणे सलमान खानच या शोचा मुख्य होस्ट असणार आहे.

बिग बॉसच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शोच्या थीमवर सध्या काम सुरु आहे. याच वेळी स्पर्धकांचे कास्टिंग देखील सुरु आहे. येत्या काळात अधिकृतरित्या १४ व्या सीझनची घोषणा केली जाईल. त्याच वेळी शोमध्ये झळकणाऱ्या स्पर्धकांची यादी देखील जाहीर केली जाईल. मात्र करोना विषाणूच्या भीतीमुळे यावेळी ‘बिग बॉस’चं घर उभारणं थोडं त्रासदायक ठरणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 4:30 pm

Web Title: bigg boss season 14 salman khan social distancing mppg 94
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये झी मराठीवर दोन नवीन मालिकांची पर्वणी
2 ‘ही’ अभिनेत्री एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी घेते इतके पैसे; कमाई जाणून व्हाल थक्क!
3 ‘बालाजी प्रोडक्शन’ आर्थिक संकटात?; बॅक स्टेज कर्मचाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
Just Now!
X