News Flash

गरोदर असल्यामुळे ‘या’ अभिनेत्रीला सोडावे लागले बिग बॉसचे घर

ही अभिनेत्री बिग बॉसच्या इतिहासातील आजवरच्या सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक आहे.

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. परंतु स्पर्धकांमधील भांडणे, शोमधील अश्लीलता, अर्वाच्छ भाषेत केले जाणारे संभाषण व विचित्र खेळ यामुळे बिग बॉस नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला दिसतो. सध्या बिग बॉसचे १३वे पर्व सुरु आहे. या शोच्या प्रत्येक सत्रात प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

Dont be the Eye Candy.. Be the Soul Food !!

A post shared by Sakshi Pradhan (@itsmesakshii) on

चौथ्या पर्वातील एका स्पर्धकाला चक्क गरोदर असल्यामुळे बिग बॉसचे घर सोडावे लागले होते. या स्पर्धकाचे नाव साक्षी प्रधान. त्यावेळी साक्षी केवळ २१ वर्षांची होती. साक्षी बिग बॉसच्या इतिहासातील आजवरच्या सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक आहे. बिग बॉसच्या घरात साक्षीला हवे तेव्हा डॉक्टरांसोबत कन्सल्ट करण्याची परवानगी देण्यात आली होती. यावरुनच ती गरोदर असल्याची बातमी समोर आली. इतकेच नाही तर तिने श्वेता तिवारी, वीणा मलिक आणि सारा खानला तिची मासिक पाळी चुकल्याचेही शोमध्ये सांगितले होते. मासिक पाळी न आल्याने अनवाँटेड प्रेग्नेंसीची भीती तिला सतावत होती. परिणामी बिग बॉसमधून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

 

View this post on Instagram

 

Really, the only thing that makes sense is to strive for greater collective enlightenment…..

A post shared by Sakshi Pradhan (@itsmesakshii) on

साक्षी प्रधान ही प्रसिद्ध मॉडेल आहे. साक्षी ‘स्प्लिट्सविला’ या डेटिंग रिअॅलिटी शोच्या दुस-या पर्वाची विजेती आहे. या शोमुळे तिला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. दरम्यान तिला एक अश्लिल व्हिडीओ देखील सोशल माडियावर व्हायरल झाला होता. या वादग्रस्त व्हिडीओमुळे तिला बिग बॉसची ऑफर मिळाली होती असे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 12:45 pm

Web Title: bigg boss television show sakshi pradhan pregnancy mppg 94
Next Stories
1 राखीच्या बोल्ड सीन देण्यावर पती म्हणतो…
2 रणवीरचे प्रताप पाहून दीपिका झाली नाराज
3 सेम टू सेम! भाऊ कदमसोबत असलेल्या ‘या’ व्यक्तीला ओळखलंत का?
Just Now!
X