News Flash

‘Bigg Boss 3’च्या विजेत्यावर पबमध्ये हल्ला!

तो 'बिग बॉस तेलुगू 3'चा विजेता आहे

‘Bigg Boss 3’च्या विजेत्यावर पबमध्ये हल्ला!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच गाजलेला शो म्हणजे ‘बिग बॉस’. आतापर्यंत या शोचे अनेक पर्व झाले असून या शोमुळे अनेक कलाकार खऱ्या अर्थाने नावारुपाला आले आहेत. त्यातच ‘बिग बॉस 3’च्या विजेत्यावर हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे. एका पबमध्ये त्याच्यावर काचेच्या बाटलीने हल्ला झाला आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

‘बिग बॉस’ हा शो हिंदीप्रमाणेच अन्य स्थानिक भाषांमध्येही प्रदर्शित होत आहे. यामध्येच ‘बिग बॉस तेलुगू 3’मधील राहुल सिप्लिगुंज याच्यावर काचेच्या बाटलीने हल्ला करण्यात आला. राहुल ‘बिग बॉस 3’चा विजेता आहे. राहुल त्याच्या मित्रासोबत एका पबमध्ये गेला होता. यावेळी काही जणांनी त्याला मारहाण केली. इतकंच नाही तर त्याच्या डोक्यावर काचेची बाटलीही फोडली.

“मी वॉशरुममधून बाहेर आल्यानंतर काही जणांनी मला घेरलं आणि माझ्याशी उगाच वाद घालू लागले. ते मला सतत शिवीगाळ करत होते. त्यामुळे ते असं करण्यामागे मी कारण विचारलं तर त्यांनी सरळ मला मारण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्या ८-१० जणांनी माझ्या मित्रांसोबतही वाद घातला आणि त्यांच्यावरही बिअरच्या बाटल्यांनी हल्ला केला”, असं राहुलने सांगितलं.

पुढे राहुलने सांगितलं, “रितेश रेड्डी आणि त्याच्या मित्रांनी केवळ त्यांची ताकद दाखविण्यासाठी हे केलं आहे. तसंच पबमध्ये मारामारी करणं, वाद घालणं ही या मुलांची पूर्वीपासूनची सवय आहे”.

दरम्यान, राहुल हा दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. बिग बॉस तेलुगू 3 जिंकल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली असून सध्या तो अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. सध्या तो एक उत्तम पार्श्वगायक आहे. मात्र लवकरच तो अभिनेता म्हणून तेलुगू चित्रपटांमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2020 11:48 am

Web Title: bigg boss telugu season 3 winner rahul sipligunj was attacked at pub video viral ssj 93
Next Stories
1 ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटातील ‘त्या’ किसिंग सीनवर २४ वर्षांनी करिश्माचा खुलासा
2 ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारचं लग्न? जाणून घ्या सत्य
3 Video : ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ उलगडतेय चित्रपटाची कथा
Just Now!
X