सध्याच्या काळामध्ये एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम साधन झालं आहे. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. यामध्ये सेलिब्रिटीदेखील सोशल मीडियावर सक्रीय असून त्यांच्याविषयीचे अनेक अपडेट्स चाहत्यांना देत असतात. यातच अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या लहानपणीचे फोटो शेअर करुन त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. यामध्येच ‘बिग बॉस 13’ मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या एका अभिनेत्याने त्याच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे सध्या या फोटोची चाहत्यांमध्ये कमालीची चर्चा सुरु आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हे नाव चाहत्यांसाठी नवीन नाही. अनेक मालिका आणि बिग बॉसमुळे घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्याचा स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. त्यामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तो सतत इन्स्टाग्राम, फेसबुक यांच्या माध्यमातून भेटीला येत असतो. त्यातच त्याने त्याच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो प्रचंड गोड दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोत सिद्धार्थला ओळखणं कठीण असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, सध्या चाहत्यांमध्ये सिद्धार्थच्या या फोटोची जोरदार चर्चा आहे. ‘बिग बॉस 13’चा विजेता झाल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. विशेष म्हणजे तो छोट्या पडद्यावरील मोस्ट पॉप्युलर स्टार आहे.