News Flash

Video : या १४ लोकांना करोना म्हणजे काय हेच माहिती नाही, कळताच अशी होती प्रतिक्रिया

सध्या देशात काय सुरु आहे हे देखील या १४ लोकांना माहिती नाही

चीनमधील वुहानमधून जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. चीनमध्ये या विषाणूमुळे तीन हजारहून अधिक जणांना प्राण गमवावा लागला आहे. चीनबरोबरच इतर ९० हून अधिक देशांमध्ये हा विषाणू पसरला आहे. यूरोप, इराण, पाकिस्तान, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. पण सध्या जगात हे सर्व सुरु असताना १४ लोकं अशी आहेत ज्यांना याबाबत कोणतीही माहिती नाही. हे १४ लोक जर्मनीतील एका घरात राहणारे लोक आहेत. नुकताच या लोकांना करोना या आजाराबद्दल माहिती देण्यात आली. सुरुवातील त्यांचा या सर्वावर विश्वास बसत नव्हता. पण सध्याची जगातील परिस्थितीबद्दल ऐकून त्यांना नंतर रडू अनावर झाले.

ही १४ लोकं आहेत तरी कोण? ती कुठे राहतात? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे. तर ही १४ लोकं जर्मनीमधील रिअॅलिटी शो बिग ब्रदरमध्ये सहभागी झालेले स्पर्धक आहेत. जर्मनीतील कोलोन येथे बिग ब्रदर हा रिअॅलिटी शो सुरु आहे. या चौदा लोकांना सध्या जगात काय सुरु आहे याची माहिती नाही. गेल्या एक महिन्यापासून हे स्पर्धक या घरामध्ये आहेत.

बिग ब्रदर्सच्या या स्पर्धकांना करोना व्हायरस बद्दल सांगण्यात आले. तसेच सध्या संपूर्ण जगातील परिस्थिती बद्दल देखील माहिती देण्यात आली. ते ऐकून सर्वच स्पर्धकांना अश्रू अनावर झाले. स्पर्धकांना करोना विषयी पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तेथे डॉक्टरांना देखील बोलवण्यात आले होते.

काय आहे बिग ब्रदर?
बिग ब्रदर हा बिग बॉस या रिअॅलिटी शोसारखा शो आहे. या शोमध्ये काही सेलिब्रिटींना एका घरात ठेवण्यात येते. बिग बॉस प्रमाणेच या शोमध्ये देखील सर्व स्पर्धकांना घरात आपापली कामे करायची असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 6:20 pm

Web Title: bigg brother contestants were unaware of coronavirus outbreak cried after knowing avb 95
Next Stories
1 Coronavirus : ढिंच्यॅक पूजाचं ‘करोना’वर गाणं, नेटकऱ्यांनी लावला डोक्याला हात
2 Video: टिक टॉकवर ‘अमिताभ’चा व्हिडिओ व्हायरल; २४ तासांत २० लाख लोकांनी पाहिला
3 कामसूत्र फेम ‘या’ अभिनेत्रीला झाली करोनाची लागण
Just Now!
X