बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी बढत घेतली होती. मात्र, महाआघाडी व एनडीए यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचा आकडा कमी होताना दिसत असून, एनडीचा आकडा वाढू लागला आहे. दरम्यान या बिहार निवडणुकीवर अभिनेत्री फराह खान अली हिने प्रतिक्रिया दिली आहे. तिने तेजस्वी यादव यांच्या विजयासाठी प्रार्थना केली आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज

“तेजस्वी यादव तुम्हाला भरपूर शुभेच्छा. यंदाच्या बिहार निवडणुकीत तुम्हीच जिंकाल अशी आम्हाला खात्री आहे. बिहारच्या नागरिकांना बदल हवाय. मला खात्री आहे की तुम्ही बिहारच्या नागरिकांची मदत कराल. बिहारला सध्या एका उत्तम प्रशासनाची गरज आहे.” अशा आशयाचं ट्विट करत फराह खान हिने तेजस्वी यादव यांना पाठिंबा दिला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अवश्य पाहा – तैमुर वडिलांसोबत करतोय शेती; छोट्या नवाबचे फोटो पाहून व्हाल थक्क

महाआघाडी-एनडीए, कोण किती जांगावर आघाडीवर?

मतमोजणीच्या काही फेऱ्या पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या माहिती प्रमाणे २४३ जागांपैकी १६१ जागांचे कल हाती येताना दिसत आहेत. यात एनडीए ८१ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजपा ४२, जदयू ३४ विकसनशील इन्सान पार्टी ५ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाआघाडी ७५ जागांवर आघाडीवर आहे. यात राजदने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस १३ व डावे ११ जागांवर आघाडीवर आहेत. बसपा एका जागेवर आघाडीवर आहे. लोजपा दोन, एमआयएमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.