बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी बढत घेतली होती. मात्र, महाआघाडी व एनडीए यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचा आकडा कमी होताना दिसत असून, एनडीचा आकडा वाढू लागला आहे. दरम्यान महाआघाडीच्या या घसरगुंडीवर बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही रडण्यास सुरुवात केली का? असा उपोधिक सवाल त्यांनी महाआघाडीच्या समर्थकांना केला आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज

अवश्य पाहा – तैमुर वडिलांसोबत करतोय शेती; छोट्या नवाबचे फोटो पाहून व्हाल थक्क

महाआघाडीची घसरगुंडी; एनडीएने घेतली आघाडी

मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीनं मोठी झेप घेतली होती. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये घसरण झाल्याचं दिसून येत आहे. आताच हाती आलेल्या कलांनुसार एनडीए सध्या १२५ जागी आघाडीवर आहे. यात भाजपा ७० जागा, जदयू ४८, व्हीआयपी ६, तर हम एका जागेवर आघाडीवर आहे. महाआघाडीने सध्या १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. यात राजद ६२, काँग्रेस २० तर डावे १९ जागांवर आघाडीवर आहे.