23 October 2018

News Flash

मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला नवा खलनायक

मराठी अभिनेत्री सोनाली खरे हिचा बिजॉय आनंद हा नवरा असल्याचे फार कमी जणांना माहिती असेल.

ये रे ये रे पैसा

आजवर मराठीत अनेक खलनायक पाहायला मिळाले. त्यातील बऱ्याच खलनायकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. असाच एक मराठी खलनायक संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटातून पाहायला मिळाला. ‘ये रे ये रे पैसा’मधील विजय मेहरा या खलनायकाच्या भूमिकेत बिजॉय आनंद हा हिंदी पडद्यावरील चेहरा झळकला.

वाचा : भाऊ कदम ठरला ‘नशीबवान’

बिजॉय आनंद यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. ज्यात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली. मराठी चित्रपटातले अनेक खलनायक आजवर लोकांच्या खूप चांगले लक्षात राहिले ते त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे! बिजॉय आनंद हा असाच एक चेहरा जो खलनायकाच्या भूमिकेत लोकांच्या चांगलाच लक्षात राहतो. अगदी डॅशिंग असं व्यक्तिमत्व असलेला हा नवा खलनायक मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला आहे. मराठी अभिनेत्री सोनाली खरे हिचा बिजॉय आनंद हा नवरा असल्याचे फार कमी जणांना माहिती असेल.

वाचा : मनालीमधील कंगनाच्या नव्या घराची किंमत माहितीये का?

दरम्यान, संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटाला समिक्षक तसेच प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी संजय जाधवने त्याच्या चित्रपटात केवळ अ‍ॅक्शनचा थरार न ठेवता त्याला विनोदाची फोडणी दिली आहे. विशेष म्हणजे आधीच्या एकाही कलाकाराला चित्रपटात घेण्याचा मोह दिग्दर्शकाने आवरला असून, ‘ये रे ये रे पैसा’ च्या निमित्ताने खूप दिवसांनी नायकाचाही चेहरा बदलला आहे आणि नायिकेचाही.. तसे खुद्द दिग्दर्शकानेच चित्रपटात कबूलही केले आहे. उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळते.

First Published on January 12, 2018 1:05 pm

Web Title: bijay anand is the new villain in marathi industry