२ ते ४ जून दरम्यान ‘नूतन रेट्रोस्पेक्टिव्ह’

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री नूतन यांच्या स्मृती जागवण्यासाठी त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा महोत्सव ‘नूतन रेट्रोस्पेक्टिव्ह’ २ ते ४ जून दरम्यान पेडर रोड येथील फिल्म डिव्हिजन येथे भरवण्यात येणार आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

या वर्षी ‘सुजाता’ या बिमल रॉय दिग्दर्शित अभिजात चित्रपटाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच ४ जून रोजी नूतनच्या ८३व्या जयंतीचे औचित्य साधून ‘बिमल रॉय मेमोरियल अ‍ॅण्ड फिल्म सोसायटी’तर्फे  या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन २ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ‘सुजाता’ या चित्रपटाने करण्यात येईल. उद्घाटनाला नूतनचे पुत्र अभिनेते मोहनिश बहल आणि बॉलीवूडमध्ये नुकतेच पदार्पण केलेली नात अभिनेत्री प्रानूतन बहल उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी ‘तेरे घर के सामने’ चित्रपट दाखवला जाईल. ‘बंदिनी’ या चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल, या वेळी नूतन यांच्या धाकटय़ा भगिनी ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा उपस्थित राहणार आहेत.

लेखिका, सामाजिक कार्यकर्त्यां, निर्मात्या, दिग्दर्शिका, चित्रपट निर्माते बिमल रॉय यांच्या कन्या आणि आयोजक रिंकी रॉय भट्टाचार्य म्हणाल्या, या प्रतिभाशाली अभिनेत्रीने चित्रपटप्रेमी तसेच चोखंदळ बुद्धिजीवी  प्रेक्षक आणि समीक्षक सर्वाच्याच हृदयात एक अढळ स्थान मिळवले आहे. तिने सत्तरहून अधिक चित्रपटांत भूमिका करून आपल्या सहजसुंदर अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीत स्वत:ची छाप सोडली. ‘सुजाता’ला साठ वर्षे पूर्ण होत आहेत. पण आपल्या धर्मनिरपेक्ष देशातल्या अस्थिर परिस्थितीत अशा तळागाळात जगणाऱ्या अनाथ, अस्पृश्य मुलीची कथा सांगणारा ‘सुजाता’ आणि  गुन्हेगाराचा शिक्का बसून तुरुंगातले, समाज-परिघाबाहेरचे जिणे नशिबी आलेल्या कल्याणीच्या आयुष्याचे विविध पदर अतिशय संवेदनशीलतेने दर्शवणाऱ्या ‘बंदिनी’सारख्या चित्रपटांचे महत्त्व जेवढे तेव्हा होते तेवढेच आजही आहे.