22 February 2019

News Flash

# MeToo : चित्रपटाच्या सेटवर साजिदचे महिलांशी वागणे खटकणारे – बिपाशा बासू

साजिद दिग्दर्शन करत असलेल्या 'हमशकल' चित्रपटाच्या सेटवर महिलांसाठी अपमानजनक वातावरण असायचे असे तिने म्हटले आहे. त्याच्या या वागण्यामुळे मी २०१४ मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनपासून दूर राहीले.

MeToo प्रकरणात दररोज एकाहून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामध्ये भर पडत असून दिग्दर्शक साजिद खान याच्यावर आरोप करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा या दोघींनंतर आता अभिनेत्री बिपाशा बासू हीने साजिदवर आरोप केले आहेत. साजिद दिग्दर्शन करत असलेल्या ‘हमशकल’ चित्रपटाच्या सेटवर महिलांसाठी अपमानजनक वातावरण असायचे असे तिने म्हटले आहे. त्याच्या या वागण्यामुळे मी २०१४ मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनपासून दूर राहीले. परंतु मी चित्रपटातील माझ्या भूमिकेबाबत आनंदी नसल्याची चुकीची चर्चा त्यावेळी केली गेली असेही ती म्हणाली.

बिपाशा म्हणते, साजिदच्या वागण्यामुळेच आपण चित्रपटाशी निगडित गोष्टींपासून दूर राहण्याचे ठरवले. यानिमित्ताने महिला अशाप्रकारच्या पुरुषांविरोधात आवाज उठवत आहेत ही अतिशय चांगली बाब आहे. तो सेटवर कायमच महिलांविषयी अतिशय वाईट विनोद करतो. तसेच तो सर्वच मुलींबाबत उद्धट वागतो असा आरोपही तिने केला. पण आपल्याला त्याच्याकडून थेट अशाप्रकारचा त्रास कधीही देण्यात आला नाही असेही तिने स्पष्ट केले. त्याच्या अशा चुकीच्या वागण्यानेच मी चित्रपटाशी निगडित गोष्टींपासून दूर राहील्याचे सेटवरील अनेकांना माहित होते.

दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या गंभीर आरोपानंतर अभिनेता अक्षय कुमारनं साजिद खानसोबत काम करण्यास नकार दिला आहे. साजिदच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचं चित्रीकरण तातडीनं रद्द करण्यात यावं अशी मागणी अक्षयनं ट्विट करून चित्रपटाच्या निर्मात्यांकडे केली आहे. हाऊसफुल्ल’, ‘हिंमतवाला’सारख्या फ्लॉप चित्रपटाचं दिग्दर्शन साजिदने केले आहे. अभिनेत्री सलोनी चोप्रानं केलेल्या आरोपांनंतर आता मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनीही साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या ट्विटर पोस्टद्वारे त्यानं साजिद खानची विकृती आणि महिलांप्रती असलेलं त्याचं असभ्य वर्तन जगासमोर आणलं होतं. त्यानंतर साजिदची बहिण असलेल्या फराह खाननं ट्विट करत साजिदच्या वर्तनावर जाहीर टीका केली आहे. मी साजिदच्या वागण्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, मी त्या प्रत्येक महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं फराह खाननं म्हटलं आहे.

First Published on October 12, 2018 7:59 pm

Web Title: bipasha basu allegations on sajid khan me too movement
टॅग MeToo