News Flash

करण- बिपाशाचे गोवा हॉलिडेचे फोटो पाहिलेत का?

हे दोघंही अनेकदा वेगवेगळ्या देशांना भेट देत असतात

बिपाशा बासू, करण सिंग ग्रोवर

बॉलिवूडचे हॉट कपल अशी ओळख असलेले बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर सध्या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. त्यांच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण ते आपल्या चाहत्यांसोबत सतत शेअर करत असतात. बिपाशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांचे गोव्यातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिपाशा पती करणसोबत स्विमिंग पूलचा आनंद लूटताना दिसते. तिने इन्स्टाग्रामवर करणसोबत फोटो शेअर करताना म्हटले की, ‘तू माझ्यासाठी सर्वकाही आहे.’

बिपाशा आणि करणला फिरायला नेहमीच आवडते. हे दोघंही अनेकदा वेगवेगळ्या देशांना भेट देत असतात. दोघंही सोशल मीडियावर फार सक्रीय असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणावरचे फोटो ते सातत्याने त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर करत असतात. करणने बिपाशाला एक सरप्राईज देण्यासाठी स्विमिंग पुलपाशी आय लव्ह यू असे लिहिले होते. बिपाशाने हा व्हिडिओही इन्स्टाग्रामवर शेअर केला.

‘अलोन’ सिनेमाच्या सेटवर बॉलिवूडच्या या ‘डस्की ब्युटी’ची करणसोबत ओळख झाली होती. मैत्रीपासून सुरु झालेला हा प्रवास कधी प्रेमात रुपांतरित झाला हे या दोघांनाही कळलं नाही. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात बिपाशाने अभिनेता करण सिंग ग्रोवरशी लग्न केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 8:17 pm

Web Title: bipasha basu and karan singh grover holiday in goa bold photos
Next Stories
1 कॅशिअरशी झाले राजपाल यादवच्या मुलीचे लग्न
2 चित्रीकरणादरम्यान कंगना पुन्हा जखमी, रुग्णालयात दाखल
3 VIDEO : अजमेर शरीफच्या दर्ग्यात पोहोचली अंकिता लोखंडे
Just Now!
X