06 March 2021

News Flash

बिपाशा आणि करणच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; ३० एप्रिलला विवाहबंधनात

बिपाशा आणि करण यांनी ‘अलोन’ या भयपटात एकत्र काम केले होते.

Bipasha Basu & Karan Singh Grover : सुरूवातीला या दोघांच्या लग्नाला घरच्यांकडून विरोध होता. बिपाशा बसूच्या आईने तर स्पष्टपणे या दोघांच्या नात्याला विरोध करत बिपाशाला करणपासून लांबच राहण्याचा सल्ला दिला होता. दुसरीकडे करणच्या आईलाही बिपाशा सून म्हणून नको होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनीही करणला बिपाशापासून दूर होण्याचा सल्ला दिला होता.

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या लग्नाच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून गुरूवारी या दोघांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली. येत्या ३० एप्रिलला बिपाशा आणि करण विवाहबंधनात अडकणार आहेत. आम्हाला ही बातमी सांगताना आनंद होत आहे. ३० एप्रिलचा दिवस आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आमचे लग्न हा खासगी सोहळा असेल, असे या दोघांनी संयुक्त निवेदनाद्वारे सांगितले आहे. करणचे हे तिसरे लग्न आहे, तर बिपाशाचे यापूर्वी अभिनेता जॉन अब्राहम याच्याशी प्रेमसंबंध होते. सुरूवातीला या दोघांच्या लग्नाला घरच्यांकडून विरोध होता. बिपाशा बसूच्या आईने तर स्पष्टपणे या दोघांच्या नात्याला विरोध करत बिपाशाला करणपासून लांबच राहण्याचा सल्ला दिला होता. दुसरीकडे करणच्या आईलाही बिपाशा सून म्हणून नको होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनीही करणला बिपाशापासून दूर होण्याचा सल्ला दिला होता.
बिपाशा आणि करण यांनी ‘अलोन’ या भयपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांच्यातील प्रेमसंबंधांची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगू लागली होती. दोघांनी याची जाहीर कबुली दिली नसली तरी हे दोघंही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसून आले. दरम्यान, करणने त्याची पत्नी जेनेफरशी घटस्फोट घेतल्याचीही चर्चा बॉलीवूड वर्तुळात आहे. २०१२ साली करणचे जेनेफरशी लग्न झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2016 2:42 pm

Web Title: bipasha basu karan singh grover announce their marriage to get hitched on april 30
Next Stories
1 देशाबद्दल लाज वाटते, ‘जंगलबुक’ला U/A प्रमाणपत्रावरून मुकेश भट्ट संतप्त
2 शाहरूख खान ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये येणार!
3 पंखे काढा, आत्महत्या टाळा – राखी सावंत
Just Now!
X