07 March 2021

News Flash

लहानपणी अशी दिसायची दीपिका पदुकोण

दीपिकाने शाळेत असताना भरतनाट्यम शिकले होते

दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोणही बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री आहे जिच्यावर लाखो चाहते आपला जीव ओवाळून टाकतात. दीपिका लहानपणापासूनच फार क्युट दिसायची. आज ती तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसादिवशी तिच्या बालपणाला आम्ही उजाळा दिला आहे.

‘ओम शांती ओम’ नव्हे, तर ‘या’ चित्रपटातून दीपिकानं केली होती करिअरची सुरूवात

दीपिकाचा सुपरहिरो कोण असा जेव्हा तिला प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा तिने वडिलांचे प्रकाश पदुकोणचे नाव घेतले होते. प्रकाश हे भारतातील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहेत. लहानपणापासून बॅडमिंटनपटू होण्याची इच्छा उराशी बाळगून असलेली दीपिका झगमगत्या दुनियेकडे कधी आकर्षित झाली हे तिचे तिलाच कळले नाही. किंगफिशरच्या हॉट मॉडेलिंग कॅलेंडर शूटमध्ये ती सर्वांसमोर पहिल्यांदा आली. यानंतर तिने लिरिल, डाबर, क्लोज अपसारख्या अनेक प्रसिद्ध ब्रॅण्डसाठी जाहिराती केल्या आहेत.

दीपिकाने शाळेत असताना भरतनाट्यम शिकले होते. सिनेमा पाहणे, आणि गाणी ऐकण्याशिवाय दीपिकाला स्वयंपाक करायला आणि झोपायला फार आवडते. तिला चॉकलेट्सही खूप आवडतात. वयाच्या १७ व्या वर्षी तिने पहिल्यांदा रँप वॉक केला होता. मॉडेलिंगमधील करिअरमध्ये आपला जम बसवत असताना ती टॉप मॉडेलही झाली होती. तिने ऐश्वर्या नावाचा पहिला कन्नड सिनेमाही केला होता. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.

२४ वर्षांनंतर एकत्र येणार सनी देओल- डिंपल कपाडिया

५ जानेवारी, १९८६ मध्ये डेनमार्कच्या कोपनहेगनमध्ये दीपिकाचा जन्म झाला. दीपिकाला एक छोटी बहिण असून तिचे नाव अनिशा आहे. अनुपम खेर यांच्या अभिनय शाळेतून अभिनयाचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने ओम शांती ओम सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सध्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाचं नाव अग्रणी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 4:19 pm

Web Title: birthday girl deepika padukone childhood unseen photos will brighten up your day
Next Stories
1 एप्रिल महिन्यात होणार सोनम- आनंदचे शुभमंगल?
2 नव्या चित्रपटासाठी ऐश्वर्याने घेतले घसघशीत मानधन
3 Padmavati Controversy : प्रसून जोशींना सेन्सॉरच्या अध्यक्षपदावरुन हटवा, करणी सेनेची मागणी
Just Now!
X