News Flash

Happy Birthday : ‘मेड इन इंडिया’ गर्ल अलिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

काँटे नही कटते, तेरा होने लगा हू, बेबी बेबी मुझे लोग बोले, तिनका तिनका यांसारखी अनेक गाणी तिने गायली.

अलिशा चिनॉय

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रॉक आणि पॉप म्युझिकलाही चांगलीच लोकप्रियता मिळाली. या प्रकारची गाणी गाजण्यामागे काही कलाकारांची नाव घेत त्यांना याचं श्रेयं द्यायचं झालं तर अशा कलाकारांमध्ये गायिका अलिशा चिनॉयच्या नावाचा आवर्जून समावेश होतो. ‘मेड इन इंडिया’ या गाण्याच्या अल्बमद्वारे वेगळ्याच प्रकारच्या गायनशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या अलिशा फारशी चर्चेत नसली तरीही तिची काही गाणी मात्र आजही अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग आहेत. चित्रपटविश्वात पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या काळात अलिशाने बप्पी लहिरी यांच्यासोबत काम केले होते. त्यानंतर बॉलिवूडच्या जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्रींसाठी अलिशाने गाणी गायली होती. ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील ‘कजरा रे…’ या गाण्यासाठी अलिशावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर, तिला फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट गायिकेच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. ९०च्या दशकात अलिशाने तेव्हाचे आघाडीचे संगीत दिग्दर्शक अनू मलिक, आनंद-मिलिंद, राजेश रोशन आणि नदीम-श्रवण यांच्याकरिता विविध बॉलीवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली. नाचेंगे (राजा हिंदुस्तानी), छा राहा हैं प्यार का नशा (चंद्रमुखी) रौंधे (प्यार तुने क्या किया), सोना सोना रूप है (बॉलीवूड / हॉलीवूड), मौजे में (कारोबार), दे दिया (कीमत), रुक रुक रुक (विजयपथ) आणि वादाचा मुद्दा ठरलेले सेक्सी सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले (खुद-दार) ही तिची काही गाणी बरीच गाजली. अशा या रॉकिंग अलिशाचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्ताने अलिशाच्या काही गाजलेल्या गाण्यांची एक झलक…..

१.’मेड इन इंडिया’ (मेड इन इंडिया)

२. काँटे नही कटते (मि.इंडिया)

३. रुक रुक रुक (‘विजयपथ’)

४. तिनका तिनका (‘कर्म’)

५. बेबी बेबी मुझे लोग बोले (खुद्दार)

६. आज की रात (डॉन)

७. बंटी और बबली (‘कजरारे’)

८. तेरा होने लगा हू (अजब प्रेम की गजब कहानी)

९. बेबो (कंबक्त इश्क)

१०. दिल तू ही बता (क्रिश ३)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 1:05 am

Web Title: birthday special 10 most popular songs of alisha chinai
Next Stories
1 चित्ररंग : देखणी आणि शहाणी परीकथा
2 ग्लॅमगप्पा : अनुष्का मस्तीच्या मूडमध्ये
3 हा आहे सोफिया हयातचा भावी वर…
Just Now!
X