08 March 2021

News Flash

एमएमएस ते मुलाचं नाव, ‘या’ कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती करिना

शाहिदसोबतचं तिचं एमएमएस प्रकरणही चर्चेचा विषय ठरलं होतं

करिना कपूर

बॉलिवूडमध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासून आपल्या अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी एक अभिनेत्री म्हणजे करिना कपूर खान. दीपिका, अनुष्का यांच्या पदार्पणाच्या बऱ्याच वर्षांपूर्वीच करिनाने तिचा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. कपूर कुटुंबातील या आणखी एका सुरेख अभिनेत्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्याच्या घडीलासुद्धा करिना एका मुलाच्या मातृत्वाची जबाबदारी सांभाळत करिअरलाही तितकच प्राधान्य देत आहे. सौंदर्य, चित्रपट, अदाकारी या कारणांमुळे चर्चेत असणारी ‘बेबो’ इतरही बऱ्याच कारणांमुळे, कॉन्ट्रोव्हर्सिजमुळे चर्चेत होती. चला तर मग नजर टाकूया ‘बेबो’ला प्रकाशझोतात आणणाऱ्या अशाच काही कॉन्ट्रोव्हर्सिजवर…

बिपाशासोबतचा वाद-
काही वर्षांपूर्वी करिना कपूर आणि बिपाशा बासू यांच्यातील वाद माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘अजनबी’ या चित्रपटात या दोघींनी काम केलं होतं. अक्षय कुमार आणि बॉबी देओलसुद्धा या चित्रपटात झळकले होते. त्याचवेळची ही गोष्ट आहे. या दोन अभिनेत्रींमध्ये असलेला वाद इतका विकोपास गेला की, दोघींनी एकमेकींसाठी केवळ अपशब्दच वापरले नाहीत तर अगदी हातही उगारला होता. करिनाने बिपाशाला ‘काली बिल्ली’ असंही म्हटलं होतं. इतक्यावरच न थांबता तिने तिच्या कानशिलातही लगावली होती. या दोघींमध्ये झालेल्या मतभेदाची बरीच चर्चा होती.

एमएमएस लीक प्रकरण-
एकेकाळी शाहिद कपूर आणि करिना कपूर रिलेशनशिपमध्ये होते ही बाब सर्वज्ञातच आहे. शाहिदसोबतच्या रिलेशनशिपमुळे करिनाला आणखी एका गोष्टीचा सामना करावा लागला होता. त्याच्यासोबतचा करिनाचा एक एमएमएस व्हायरल झाला होता. आजही त्यांच्या या एमएमएस प्रकरणीच्या चर्चा रंगते.

प्रियांकासोबतची ‘कॅटफाईट’-
‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये आल्यावर इंडस्ट्रीतील बऱ्याच जणांबद्दल सेलिब्रिटी अशी काही वक्तव्य करतात की विचारायची सोय नाही. करिना आणि ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राच्या वादालाही अशाच प्रकारे सुरुवात झाली होती. ‘कॉफी विथ करण’मध्ये प्रियांकाच्या बोलण्याच्या शैलीवरुन करिनाने तिची खिल्ली उडवली होती. नंतर याच कार्यक्रमात जेव्हा प्रियांका आली तेव्हा तिने करिनाला सडेतोड उत्तर देत ‘जिथून सैफ त्याच्या बोलण्याची पद्धत शिकला, तिथूनच मीही शिकले,’ असं म्हणाली होती.

मुलाच्या नावामुळे झालेला वाद-
गरोदरपणातही कामापासून न दुरावलेल्या करिनाची अनेकांनीच प्रशंसा केली होती. पण, मुलाचं नाव तैमुर ठेवण्यात आल्याचं कळताच तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. एका क्रूर शासकाच्या नावावरुन त्याचं नामकरण करण्यात आल्यामुळे करिनावर अनेकांनीच आगपाखड केली होती.

‘मोठे चित्रपट नाकारल्याचा अभिमान वाटतो…’
‘रेफ्युजी’ या चित्रपटातून पदार्पण करण्याऐवजी करिनाला ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटात काम करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. पण, तिने यासाठी नकार दिला होता. ‘रेफ्युजी’ हा चित्रपट प्रेक्षकांची दाद मिळवू शकला नाही. त्यावेळी करिनाच्या निर्णयावर अनेकांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण, तिला मात्र या निर्णयात काहीच चुकीचं वाटत नव्हतं. याविषयीचं स्पष्टीकरण देत ती म्हणाली होती, “मोठे चित्रपट नाकारुन इतरांना संधी दिल्याचा मला अभिमान वाटतो. मी चित्रपट नाकारल्यामुळेच ते आज मोठे सेलिब्रिटी झाले आहेत.”

‘कुर्बान’ चित्रपटाचं ‘ते’ पोस्टर-
सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘कुर्बान’ या चित्रपटाच्या एका पोस्टरमुळे बऱ्याच वादांना तोंड फुटलं होतं. अतिशय बोल्ड अशा या पोस्टरमुळे या चित्रपटाचा आणि पर्यायी करिना सैफचाही मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 4:37 am

Web Title: birthday special bollywood actress kareena kapoor controversies
Next Stories
1 सिनेमा प्रदर्शनापूर्वीच साराने दाखवले ‘स्टार कीड’चे नखरे?
2 करिनावर प्रेम करणाऱ्या तुषारला करावा लागला होता भावाचा रोल
3 रिया सेनच्या रिसेप्शनचे फोटो पाहिले का?
Just Now!
X