23 January 2021

News Flash

Birthday Special : म्हणून बोल्ड सीन संपताच रेखा यांना कोसळलं रडू

रेखा हा किस्सा अजूनही विसरल्या नाहीत

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून रेखा ओळखल्या जातात. आज १० ऑक्टोबर रोजी रेखा यांचा वाढदिवस आहे. १९५४ साली रेखा यांचा जन्म तामिळनाडूमधील चेन्नईमध्ये झाला. वयाच्या १२ व्या वर्षी रेखा यांनी बाल कलाकार म्हणून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. सदाबहार रेखा आजही त्यांच्या सौंदर्यासोबतच अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर जादू करताना दिसतात. मात्र करिअरच्या चर्चांसोबतच रेखा यांचे खासगी आयुष्यही कायम चर्चेत होते.

एक अभिनेत्री म्हणून प्रकाश झोतात आलेल्या रेखा यांच्या खासगी आयुष्यात फार अडचणी होत्या. त्यांच्या आईने घेतलेल्या कर्जामुळे त्यांना कमी वयात जबाबदाऱ्या स्वत:च्या खांद्यावर घ्याव्या लागल्या. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पैशांसाठी त्यांनी अनेक बोल्ड सीनही दिले.

१९६८ रोजी रेखा यांचा पहिला तेलुगू चित्रपटत प्रदर्शित झाला. या चित्रपटानंतर त्यांना बॉलिवूड चित्रपटाच्या अनेक ऑफर येऊ लागल्या. १९७० साली त्यांनी ‘सावन भादो’ हा पहिलावहिला हिंदी चित्रपट केला. रेखा यांच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र बॉलिवूडमधील सुरुवातीच्या करिअरमध्ये रेखा यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. यासीर उस्मान यांनी रेखा यांच्या जीवनावर आधारित ‘रेखा: अॅन अनटोल्ड स्टोरी’ पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात यासीर यांनी रेखा यांच्या ‘अनजाना सफर’ चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानचा किस्सा सांगितला आहे.

या चित्रपटात बिश्वजीत चॅटर्जी हे अभिनेत्याच्या भूमिकेत होते. चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शकाने ‘अॅक्शन’ म्हणताच अभिनेत्याने त्यांना मिठीत घेऊन चुंबन घेण्यास सुरुवात केली होती. या बोल्ड सीनबद्दल रेखा यांना जराही कल्पना नव्हती. सीन संपल्यावर रेखा यांना प्रचंड रडू कोसळले होते. या सीननंतर त्यांनी अनेक बोल्ड सीन दिले पण हा किस्सा त्या विसरु शकल्या नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 9:24 am

Web Title: birthday special know about actress rekha avb 95
Next Stories
1 अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा
2 रेखा-विनोद मेहरा यांनी सर्वांच्या नकळत लग्न केले तेव्हा..
3 एका लक्ष्मीची दुसऱ्या लक्ष्मीसाठी पोस्ट, अक्षय कुमार म्हणाला….
Just Now!
X