News Flash

Birthday Special : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्याविषयी काही खास गोष्टी

त्यांनी आतापर्यंत १२० हून अधिक हिंदी आणि बंगाली चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत.

गेली अनेक वर्ष बॉलिवूड आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे शबाना आझमी. आज १८ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी १९७४ साली प्रदर्शित झालेल्या ‘अंकुर’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. शबाना यांनी आतापर्यंत १२० हून अधिक हिंदी आणि बंगाली चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत. यात व्यावसायिक तसेच समांतर चित्रपटांचा समावेश आहे.

कवी आणि पटकथाकार जावेद अख्तर यांची पत्नी असलेल्या शबाना या केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर त्यांचा अन्य क्षेत्रांमध्येही सक्रिय सहभाग असल्याचे पाहायला मिळते. अभिनय करण्याबरोबर सामाजिक आणि स्त्रियांच्या अधिकाराच्या चळवळीतदेखील त्या सक्रिय असतात. या व्यतिरिक्त त्यांना डॉक्टरेट ही पदवीदेखील मिळाली आहे.

जागतिक मनोरंजनसृष्टीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल टेरी(TERI) विद्यापीठातर्फे शबाना आझमी यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली असून यापूर्वी त्यांना जादवपूर विद्यापीठ, लीडस मेट्रोपोलिटिअन विद्यापीठ, जामीया मिलिया विद्यापीठ आणि सायमन फ्रेझर विद्यापीठाकडून डॉक्टरेटची पदवी मिळाली होती. तसेच त्यांना पाचवेळा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीला पाऊल ठेवणाऱ्या शबाना यांनी राष्ट्रीय चित्रपटांप्रमाणेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून भूमिका वठविल्या आहेत. ‘जुनून’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘कंधार’, ‘स्पर्श’, ‘पार’, ‘सती’, ‘अर्थ’ आणि ‘गॉडमदर’ इत्यादी एका पेक्षा एक सरस अशा चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. जॉन श्लेसिंगर यांचा ‘मॅडम सोऊसाटस्का’ आणि रोनाल्ड जॉफ यांचा ‘सिटी ऑफ जॉय’ या हॉलिवूड चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:19 pm

Web Title: birthday special know about shabana azmi avb 95
Next Stories
1 मिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले…
2 “एकदा भेटा मग दाखवतो”; खोट्या मेसेजद्वारे पैसे उकळणाऱ्यांवर सोनू सूद संतापला
3 “एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा”; कंगनाला सल्ला
Just Now!
X