News Flash

‘या’ कारणामुळे लग्नानंतरही १२ वर्षे मंदिरा बेदी होऊ शकली नाही आई

तिने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता.

वयाच्या ४९व्या वर्षीही तितकीच हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मंदिरा बेदी. आजही मंदिरा बेदीकडे फिटनेस आयकॉन म्हणूनही पाहिले जाते. ‘शांती’ मालिकेपासून ते ‘क्यों की सास भी कभी बहुती’ मालिकेपर्यंत मंदिराने छोट्या पडद्यावर जादू केली होती. आज १५ एप्रिल रोजी मंदिराचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी.

काही दिवसांपूर्वी मंदिरा दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटामध्ये झळकली. त्यावेळी एका मुलाखतीमध्ये मंदिराने तिला आई होण्याचा अनुभव लग्नानंतर तब्बल १२ वर्षांनी घेतला आल्याचा खुलासा केला. नतंर मंदिराने त्यामागील कारणही सांगितले आहे. हे कारण ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Video : ‘एक नारळ दिलाय…’, आगरी गाण्यावर रितेशचा भन्नाट डान्स

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार मंदिरा बेदीने १९९९मध्ये चित्रपट दिग्दर्शक राज कौशलशी लग्न केले. मात्र आई होण्यासाठी मंदिराला तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली. ‘मी केलेल्या करारामुळे २००१ मध्ये वयाच्या ३९व्या वर्षी मी माझ्या मुलाला जन्म दिला. मला भीती वाटायची की जर मी गर्भवती झाले तर माझ्या करिअरला पूर्ण विराम लागेल’ असे मंदिरा म्हणाली होती.

आणखी वाचा :‘हेरा फेरी’मधील देवीप्रसादची नात आठवतेय का?; आता तुम्हालाही ओळखता येणार नाही

पुढे मंदिरा म्हणाली, ‘कधीकधी हे मनोरंजन क्षेत्र क्रूर आहे असे वाटते. इथे कधी काय होईल कोणीच सांगू शकत नाही. पण या इंडस्ट्रीमध्ये निभावण्यासाठी माझ्या नवऱ्याने मला पाठिंबा दिला. त्याच्या पाठिंब्याशिवाय मी या इंडस्ट्रीमध्ये जगू शकले नसते.’

लग्नाच्या तब्बल १२ वर्षानंतर २०११ मध्ये मंदिराने वीर या आपल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने एका मुलीला दत्तक घेतले. मंदिराने तिच्या मुलीचे नाव तारा असे ठेवले आहे. तारा ४ वर्षांची आहे. मंदिरा बऱ्याचवेळा तारासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिला त्यामुळे ट्रोल देखील करण्यात आले होते. मंदिरा देखील शांत बसली नाही. तिने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 10:29 am

Web Title: birthday special madira bedi once talk about her late pregnancy avb 95
Next Stories
1 विमानात प्रियांका चोप्राची कॉकटेल पार्टी, दारुच्या नशेत अखेर ती…
2 नियमांचे पालन करून चित्रीकरणासाठी वाहिन्या आग्रही
3 राधिका आपटेची कम्माल….स्कर्टलाच बनवलं लुंगी!
Just Now!
X