News Flash

Video: …अन् गडकरी ‘बिग बीं’ना म्हणाले, “नाटक मत कर, रख नीचे फोन”

'लोकसत्ता'च्या एका कार्यक्रमात गडकरींनी ऐकवला खास किस्सा

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज (२७ मे) वाढदिवस साजरा होत आहे. सध्या केंद्रात मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातही युती सरकारच्या काळात मंत्रीपद भूषवलेलं आहे. त्या कारकीर्दीत गडकरींनी केलेली काही कामांची अजूनही चर्चा होते. त्याबद्दल अनेकदा ऐकायला वाचालया मिळतं. पण, त्या काळातील दुर्मिळ असा एक किस्सा गडकरींनी स्वतः सांगितला होता. हा किस्सा आहे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्याबद्दल. अमिताभ बच्चन यांनी गडकरींना फोन केला होता. मात्र गडकरींनी ‘नाटक मत कर, रख नीचे फोन’ असे म्हणत बिग बींचा फोन कट केला होता. स्वत: गडकरींनी हा किस्सा ‘लोकसत्ता’च्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितला होता.

गडकरी यांनी बच्चन यांच्याबद्दलचा एक मजेदार किस्सा नागपूरकरांना ऐकवला होता. ‘सुरुवातीच्या काळात माझी आणि अमिताभ बच्चन यांची फारशी ओळख नव्हती. त्याच काळात एकदा अमिताभ यांनी मला फोन केला. फोनवरील व्यक्तीने पलिकडून हॅलो, मैं अमिताभ बोल रहा हूँ असे सांगितले. त्यावेळी माझी कोणीतरी मस्करी करत असल्याचे मला वाटले,’ असे गडकरींनी त्या फोन कॉलबद्दल बोलाताना सांगितले होते.

आणखी वाचा : जेठालालच्या ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’ दुकानाचा कोण आहे मालक? जाणून घ्या

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील नट्टू काका आर्थिक संकटात? त्यांनीच केला खुलासा

या फोन कॉलला आपण एकदम मजेशीर उत्तर दिल्याचे सांगताना पुन्हा अमिताभ यांचा फोन आल्यानंतर आपण चुकल्याचे लक्षात आल्याचेही गडकरींनी त्यावेळी सांगितले होते. ‘कोणीतरी मस्करी करत असल्याचे समजून मी, नाटक मत कर चल फोन रख असं म्हणत फोन कट केला. मात्र थोडा वेळात मला परत फोन आला आणि परत तोच आवाज ऐकू आला. मी खरोखरच अमिताभ बच्चन बोलत असल्याचे पलिकडच्या व्यक्तीने अगदी गांभीर्याने सांगितल्यानंतर मला चूक लक्षात आली,’ अशी आठवण गडकरींनी या कार्यक्रमात सांगितली.

तसेच या कार्यक्रमात त्यांनी मराठी पदार्थांची चव चाखण्यासाठी अनेक दिग्गज मंडळी माझ्या घरी येतात असे ही म्हटले होते. अगदी अभिनेता जॅकी श्रॉफ माझ्या घरी आला तेव्हा वरण प्यायला होता, सलमान खान पोहे अगदी आवडीने खातो, सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी हिला थालीपीठ आवडते अशा अनेकांच्या आवडी-निवडी गडकरींनी उपस्थितांना सांगितल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 12:28 pm

Web Title: birthday special once nitin gadkari cut amitabh bachchans phone call avb 95
Next Stories
1 पाकिस्तानची चेष्टा केल्याने झाली नाराज; प्रियकरासोबत ठरलेलं लग्न अभिनेत्रीने मोडलं
2 ‘फ्रेण्डस्’ शोच्या सेटवरील अमानीचा संघर्ष माहितेय का?, लेखकाने केला होता छळ
3 ‘मिशन इम्पॉसिबल 7’मध्ये दिसणार प्रभास? दिग्दर्शक किस्टोफर यांनी केला खुलासा
Just Now!
X