News Flash

परिणीतीचं पहिलं ‘क्रश’ माहितीये का?

परिणीतीला या अभिनेत्यासोबत लग्नही करायचं होतं, पण...

परिणीती चोप्रा

बॉलिवूड कलाकारांच्या ब्रेकअप आणि अफेअरच्या अनेक चर्चा ऐकायला मिळतात. पण अभिनेत्री परिणीती चोप्राच्या प्रेमप्रकरणाबाबत कधीच फारशी चर्चा झाली नाही. परिणीती दिग्दर्शक मनीष शर्माला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र अनेक वेळा ती मुलाखतींमध्ये रिलेशनशिपविषयी बोलणं टाळते. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी परिणीतीला कलाविश्वातील एक अभिनेता प्रचंड आवडता होता. इतकंच नाही तर तिला त्याच्यासोबत लग्नही करायचं होतं.

कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते सैफ अली खानचे आज असंख्य चाहते आहेत. केवळ देशातच नाही तर विदेशातही त्याचे फॅन आहेत. विशेष म्हणजे या फॅनमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्राचाही समावेश आहे. ती सैफची खूप मोठी चाहती आहे. इतकंच नाही तर तिचं पहिलं क्रशही सैफचं होता. सैफशी संबंधित प्रत्येक गोष्ट परिणीती त्यावेळी जपून ठेवत असते.  त्याच्यासाठी तिने काही चिप्सची पाकिटंही गोळा करुन ठेवली होती.

सैफची लोकप्रियता अफाट असून त्याने अनेक नामांकित ब्रॅण्डसाठी जाहिराती केल्या आहेत. त्यामुळे अनेक वेफर्स, चॉकलेट किंवा अन्य गोष्टींवर सैफचे फोटो सहज झळकत असतात. विशेष म्हणजे सैफवर असलेल्या या क्रशमुळेच तिने कधीकाळी त्याचे फोटो असलेल्या चिप्सची पाकिटं गोळा केली होती. दरम्यान, परिणीतीला सैफसोबत लग्नही करायची होतं. मात्र सैफने करिनाची निवड केली. काही दिवसापूर्वी परिणीतीने करिनासमोर तिला सैफ आवडत असल्याचं सांगितलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 11:38 am

Web Title: birthday special parineeti chopra first crush saif ali khan ssj 93
Next Stories
1 रितेश म्हणाला लव्ह यू; विद्या बालननं दिला भन्नाट रिप्लाय
2 ‘मी तुमची तक्रार करेन’, मतदानानंतर निवडणूक अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन
3 या फोटोमध्ये नीना गुप्ता यांना ओळखलंत का?
Just Now!
X