हे माँ माताजी असं म्हणतं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे दिशा वकानी. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेच्या माध्यमातून दिशा घराघरात पोहोचली. टीव्हीवर सर्वात जास्त टीआरपी कमावणाऱ्या या शोमध्ये दिशाने दयाबेन ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या भूमिकेमुळे दिशाला एक नवीन ओळख मिळाली आहे. मात्र छोटा पडदा गाजवण्यापूर्वी दिशाने एका चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं हे फार कमी जणांना माहित आहे.

१७ सप्टेंबर १९७८ साली गुजरातमध्ये जन्मलेली दिशा आज कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे . तारक मेहता का उल्टा चष्मा, खिचडी अशा काही गाजलेल्या मालिकांव्यतिरिक्त दिशाने काही चित्रपटांमध्येदेखील काम केलं आहे. दिशाने १९९७ मध्ये १९९७ मध्ये ‘कमसिन: द अनटच्ड’ या चित्रपटात काम केलं आहे. हा दिशाचा पहिला चित्रपट असून तो बी-ग्रेड आहे. या चित्रपटानंतर तिने अन्य काही चित्रपटांमध्येदेखील छोटेखानी भूमिका साकारली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disha Vakani (@dishavakanioffcal) on


दिशा २००८ पासून सब टीव्हीच्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून दिशाला लोकप्रियता मिळाली. शिवाय ‘खिचडी’ (२००४) आणि ‘इंस्टेंट खिचडी’ (२००५) या मालिकांमधून ती छोट्या पडद्यावर दिसली आहे. दिशाने आतापर्यंत १० पेक्षा जास्त टेली अवॉर्ड्स जिंकले आहेत. याशिवाय, बॉलिवूडच्या ‘कमसिन : द अनटच्ड’ (१९९७), ‘फूल और आग’ (१९९९), ‘देवदास’ (२००२), ‘मंगल पांडे : द राइजिंग’ (२००५), ‘सी कंपनी’ (२००८) आणि ‘जोधा अकबर’ (२००८) या चित्रपटांमध्येही तिने काम केले होते.