News Flash

Birthday Special : सैफशी लग्न करण्यापूर्वी करीनाने ठेवली होती ‘ही’ अट

आज सैफच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याच्या विषयी काही खास गोष्टी

गंभीर भूमिका असो किंवा विनोदी भूमिक असो आपल्या अभिनय कौशल्याने अनेकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे सैफ अली खान. आज १६ ऑगस्ट रोजी सैफचा वाढदिवस आहे. सैफने त्याच्या पेक्षा वयाने १० वर्षांनी लहान असणाऱ्या करीना कपूरशी २०१२मध्ये लग्न केले. पण करीनाने लग्नापूर्वी सैफ समोर एक अट ठेवली होती.

‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ आणि करीना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी ‘कुरबान’ या चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटातील त्या दोघांची रोमॅण्टिक केमिस्ट्री चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतरली. एका मुलाखतीदरम्यान सैफला जोडीदार म्हणून निवडण्याचे कारण करीनाने स्पष्ट केले होते. ‘मला स्वावलंबी राहणे जास्त आवडते. लग्नानंतरही मला चित्रपटात काम करायचे आहे. पत्नी किंवा आई झाल्यानंतरही माझ्या करिअरवर त्या गोष्टींचा कोणताच परिणाम झाला नाही पाहिजे असे मला वाटते’ असे करीना म्हणाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by saif ali khan (@saif_alikan) on

लग्नापूर्वी करीनाने सैफसमोर एक अट ठेवली. या अटीसंदर्भात ती पुढे म्हणाली की, ‘मला आयुष्यभर पैसे कमवायचे आहेत. लग्नानंतरही चित्रपटसृष्टीत करिअर करणार असल्याची अट मी सैफसमोर ठेवली. या गोष्टीला त्याचा नकार नव्हता, म्हणून मी लग्नासाठी तयार झाले.’

सैफ आणि करीनाने २०१२मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले. त्यांनतर २०१६मध्ये तैमुरचा जन्म झाला. आता करीना पुन्हा आई होणार असल्याचे समोर आहे. अनेकांनी करीना आणि सैफला शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 7:30 am

Web Title: birthday special saif ali khan kareena kapoor love story avb 95
Next Stories
1 संवेदनशील अभिनेते जितेंद्र जोशी यांच्याशी वेबसंवाद
2 चित्रचाहूल : न देखवी डोळा..
3 झी मराठीवर वेगळ्या धाटणीची ‘देवमाणूस’
Just Now!
X