News Flash

Birthday Speaial: शाहरुख खानचा मुलगा अबरामने ‘या’ सिनेमातून केली आहे बॉलिवूडमध्ये एण्ट्री!

शाहरुखसोबत चिमुकल्या अबरामचा क्यूट अंदाज

शाहरुख खानच्या लाडक्या लेकाचा म्हणजेच अबराम खानचा आज आठवा वाढदिवस आहे. २०१३ सालात सरोगसीच्या मदतीने अबरामचा जन्म झाला. स्टार किडस् मध्ये अबरामची कायमच चर्चा असते. बॉलिवूडच्या अनेक सोहळ्यांमध्ये शाहरुखसोबत अबरामला स्पॉट केलं जातं. सोशल मीडियावरही अबरामचे फोटो अनेकदा व्हायरल होताना दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का शाहरुखच्या एका सिनेमातून लहानग्या अबरामने आधीच बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकलं आहे.

या सिनेमात झळकला होता अबराम
शाहरुखचा मुलगा अबरामने २०१४ सालामध्ये आलेल्या ‘हॅपी न्यू इयर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली आहे. खरं तर जरी तुम्ही एकाग्रतेने सिनेमा पाहिला तरी तुम्हाला अबराम  सिनेमात  कुठेच झळकताना दिसणार नाही. मात्र सिनेमाच्या शेवटी क्रेडीटमध्ये अबराम दिसून आलाय. फक्त अबरामच नाही तर शाहरुखची पत्नी गौरीदेखील दिसून आली आहे. ‘साडे मेनू क्यू शराबी कहते है’ या गाण्याच्या शेवटी शाहरूख अबरामसोबत नाचताना दिसतोय. या गाण्यात अबराम खूपच गोंडस दिसतोय.

एका मुलाखतीत शाहरुखने यावर खुलासा केला होता. “खरं तर हा खूप घाईत घेतला गेलेला निर्णय होता.” असं शाहरुख म्हणाला. यापूर्वी शाहरुखचा मोठा मुलगा आर्यनही एका सिनेमात झळकला होता. जेव्हा तो अडीच वर्षांचा होता.

शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानादेखील अनेकदा लहानग्या अबरामसोबत सोशल मीडियावर क्यूट फोटो शेअर करत असतात. या फोटोंना नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळताना दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 10:15 am

Web Title: birthday special shaharukh khan son abram khan bollywood debut in happy new year kpw 89
Next Stories
1 सुष्मिता सेनच्या लेकीने शेअर केला ग्लॅमरस फोटो; सोशल मीडियावर रिनी सेनचा फोटो व्हायरल
2 अंदमान वॅकेशनचे फोटोज लीक झाल्यानं भडकल्या आशा पारेख; ते आमचं खाजगी वॅकेशन होतं…
3 ‘सैफ आणि सोहा पेक्षा करीनावर जास्त विश्वास आहे’, कारण सांगत शर्मिला यांनी केला खुलासा
Just Now!
X