अनेक वेळा बॉलिवूड कलाकार पडद्यावरील भूमिकांमुळे त्यांच्या खासगी आयुष्याती गोष्टी लपवण्यास यशस्वी होतात. तर काही कलाकार मीडियासमोर खासगी आयुष्यातील गोष्टी मांडण्यापासून लांब पळतात. मात्र बॉलिवूडमधील एक अभिनेत्री अशी आहे जिच्या समोर अनेक बड्या कलाकारांनी पोल खोलली होती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून टीव्ही होस्ट सिमी ग्रेवाल आहे. आज सिमी ग्रेवालचा ७२ वा वाढदिवस आहे.

सिमी ग्रेवाल तिच्या अभिनयापेक्षा टॉक शोमुळे जास्त लोकप्रिय होती. आज देखील सिमीचा टॉक शो (Rendezvous with Simi Garewal) अनेक बॉलिवूड कलाकारांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी सर्वांसमोर आणण्यासाठी आठवला जातो. या शोच्या माध्यमातून सिमी खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली होती. शोमध्ये बोलवण्यात येणारे कलाकार भावूक होऊन त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी सर्वांसमोर शेअर करत असत.

सिमीच्या या शोध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायला पाहुणी कलाकार म्हणून बोलवण्यात आले होते. या शो दरम्यान ऐश्वर्याने सलमानबद्दलच्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या होत्या. सिमीने ऐश्वर्याला ‘देशातील सर्वात सेक्सिएस्ट व्यक्ती कोण आहे?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर ऐश्वर्याने प्रेमाने सलमान खानचे नाव घेतले होते.

आणखी वाचा : स्वत:च्या लग्नात राधिकाने नेसली आजीची फाटलेली साडी

सिमी तिच्या खासगी आयुष्यामुळे कधीच चर्चेत नव्हती. तिने रवि मोहन यांच्याशी लग्न केले होते. पण तिचा संसार फार काळ टिकला नाही. काही दिवसांमध्येच सिमीने घटस्फोट घेतला. त्यानंतर सिमीने टीव्ही शो होस्ट करण्यास सुरुवात केली आणि एक वेबसाईटही सुरु केली. काही दिवसांपूर्वी सिमीचा टॉक शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच शोच्या पहिल्याच, कमबॅक भागामध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांना बोलवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.