News Flash

Birthday Special : ‘टायगर’ नावाची रंजक कहाणी; जॅकी श्रॉफ की जुबानी

अभिनेता टायगर श्रॉफचा आज ३१ वा वाढदिवस

अभिनेता टायगर श्रॉफचा आज ३१ वा वाढदिवस. अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा म्हणून ओळख निर्माण करण्याऐवजी टायगरने बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची ओळख निर्माण केलीय. २०१४ साली हिरोपंती चित्रपटामधून पदार्पण करणाऱ्या टायगरने अनेक अॅक्शनपटांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. अभिनेत्री दिशा पटानीबरोबर असणाऱ्या नात्यामुळेही अनेकदा टायगर चर्चेत आला आहे. मात्र याचबरोबरच तो आणखीन एका गोष्टीसाठी चर्चेत असतो ती म्हणजे त्याचं नावं. टागयगरचं खरं नाव काय आहे हे आजही अनेकांना ठाऊक नाही. मात्र आपल्या मुलाचं नाव टायगर ठेवण्यासंदर्भातील किस्सा जॅकी श्रॉफ यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.

टायगरचे खरे नाव वेगळचं

अभिनेता टायगर श्रॉफला टायगर हे नाव त्याला कसे पडले याबद्दल त्याचे वडील म्हणजेच जॅकी श्रॉफ यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता. मुळात टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असं असल्याचं जॅकी यांनी म्हटलं होतं.

टायगर नावामागील कहाणी काय?

पण या जयला टायगर नाव कसे पडले याबद्दल जॅकी यांनी टायगर नावाची कथा आणि जयच्या लहानपणीची एक आठवण सांगितली होती. “जय लहान होता तेव्हा तो सर्वांचा चावा घ्यायचा. त्यामुळेच मी त्याला लाडाने माझा टायगर असं म्हणायचो. त्यातूनच पुढे त्याला मी टायगर म्हणून लागलो आणि तेच नाव त्याची ओळख बनलं,” असं जॅकी म्हणाले. मात्र आता संपूर्ण जग जॅकी यांच्या मुलाला टायगर नावाने ओळखत असतानाच त्यांनी आता टायगरला वेगळचं नाव दिलं आहे. “माझे वडील मला नेहमी भीडू किंवा मेरा बच्चा अशा नावाने आवाज देतात. त्यांना हे दोन्ही शब्द फार आवडतात,’ असं टायगरने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

टायगरला कधीच त्यासंदर्भात सल्ला देत नाही

“टायगरने कोणते चित्रपट निवडावेत किंवा कसा अभिनय करावा याबद्दल मी त्याला कधीच सल्ला देत नाही,” असंही जॅकी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. “चित्रपटामधील टायगरचे अॅक्शन सिन्स पाहिल्यावर मी त्याच्याशी चर्चा करतो आणि काय आवडले काय खटले हे सांगतो,” असं जॅकी यांनी स्पष्ट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 9:34 am

Web Title: birthday special tiger shroff real name and story behind name tiger scsg 91
Next Stories
1 ‘नोमॅडलँड’, ‘बोराट २’ला गोल्डन ग्लोब पुरस्कार
2 ‘त्या’ चौघींची गोष्ट लवकरच येणार सर्वांसमोर
3 ऐश्वर्यानंतर दीपिकासारखी दिसणारी व्यक्ती चर्चेत, फोटो पाहून व्हाल थक्क
Just Now!
X