News Flash

काजोलच शाहरुखची पत्नी असल्याचा झाला समज; गौरीला पाहून वरुण धवन झाला होता थक्क

Birthday Special:

किंग खान शाहरूख आणि काजोलच्या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. काजोल आणि शाहरुखच्या जोडीला प्रेक्षकांनी देखील चांगलीच पसंती दिली आहे. ९० च्या दशकातील अनेक सिनेमांमधुन या जोडीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांच्या स्क्रीनवरील केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली होती. यामुळेच अभिनेता वरुण धवन याला लहानपणी काजोल आणि शाहरुख पती-पत्नी असल्याचं वाटतं असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

वरुण धवनने ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. या शोच्या एका भागात वरुण धवन आणि शाहरुखने हजेरी लावली होती. यावेळी वरुणने एक जुना अनुभव शेअर केला. ” मी एकदा एनवीएची वर्गणी घेण्यासाठी शाहरुखच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांची पत्नी गौरी यांनी दार उघडलं. मात्र हे पाहून मी शॉक झालो. दोन मिनिटं मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो. नंतर वर्गणी घेऊन घरी परतल्यावर मी आईला सांगितलं की तिथे काजोल मॅम नव्हत्या. तेव्हा आईने सांगितलं काजोल नव्हे तर गौरी शाहरुखची बायको आहे.” वरुने सांगितलेला हा किस्सा ऐकून त्यावेळी शाहरूखला ही हसू आवरलं नाही.

(photo-indian express)

एका मुलाखतीत काजोलने सांगितलं होतं की आमच्या दोघांमध्ये असलेल्या मैत्री मुळे एकत्र काम करणं सोपं जायचं. मला शाहरूख पुढे काय करणार याचा अंदाज आधीच यायचा. त्यामुळे हिच केमिस्ट्री स्क्रिनवरही दिसायची.

वाचा:वडिलांच्या सिनेमात काम करण्याची वरुणची नव्हती इच्छा, म्हणूनच त्याने…

शाहरुख आणि काजोलने ‘बाजीगर’ ‘दिल वालें दुल्हनिया ले जाएंगे’, ‘करण-अर्जुन’ तसचं ‘कुछ कुछ होता है’ अशा सुपरहिट सिनेमांमधुन चाहच्यांची मनं जिंकली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 10:17 am

Web Title: birthday special varun dhavan reveals he thought kajoj is shaharukh khans wife kpw 89
Next Stories
1 बॉलिवूडला आणखी एक धक्का; करोनामुळे अभिनेता ललित बहलचे निधन
2 वडिलांच्या सिनेमात काम करण्याची वरुणची नव्हती इच्छा, म्हणूनच त्याने…
3 रिया चक्रवर्तीने शेअर केली पोस्ट, “कठीण काळात एकत्र येणं गरजेचं..मदत हवी असल्यास..”
Just Now!
X