अभिनेत्री नेहा धुपियाने नुकतंच तिच्या बाळाचं नाव ‘मेहेर’ ठेवल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं . यावेळी तिने तिच्या चिमुकल्या बाळाच्या पायांचा फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून नेहा- अंगदची चिमुकली कशी दिसत असेल याची चाहत्यांना उत्सुकता होती. मात्र चाहत्यांच्या या उत्सुकतेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. नेहाचे सासरे आणि सुप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांनी मेहेरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘मेहेरच्या येण्यामुळे माझ्या लाईफलाईनमध्ये वाढ झाली आहे. आमच्या आयुष्यात तुझ्या येण्यामुळे एक वेगळाच आनंद निर्माण झाला आहे. या नव्या दुनियेमध्ये तुझं स्वागत आहे. तू कायम आनंदी राहो हिच अपेक्षा’, असं बिशन सिंह यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, नेहा लग्नाअधीच गरोदर असल्यामुळे १० मे रोजी नेहा आणि अंगदने घाईघाईमध्ये लग्न उरकलं होतं. या दरम्यान, आपल्या प्रेग्नंसीची गोष्ट तिने जगापासून लपवून ठेवली होती.मात्र नंतर नेहाने एका मुलाखतीमध्ये ती गरोदर असल्याची कबुली दिली होती.